Tarun Bharat

दापोली तालुक्यातील गिम्हवणेतील बेपत्ता उमेदवार मतदानाला हजर

प्रतिनिधी / दापोली

दापोली तालुक्यातील गाजत असलेल्या बेपत्ता उमेदवार प्रकरणी बेपत्ता झालेला तो उमेदवार मतदानाच्या पाच मिनिटं आधी गिम्हवणे ग्रामपंचायतीमध्ये हजर झाला. यामुळे या बेपत्ता प्रकरणावर आता पडदा पडला आहे.

दापोली तालुक्यातील गिम्हवणे ग्रामपंचायत ही दापोली शहराला लागून एक मोठी ग्रामपंचायत म्हणून नावाजलेली आहे. या ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत तेरा जागांपैकी पाच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या व आठ जागांच्या निवडणुका पार पडल्या.

गिम्हवणे ग्रामपंचायत ही वनंद व गिम्हवणे अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. गावाला वनंद गावातून तीन सदस्य ग्रामपंचायतीवर निवडून देतात. यंदा गावाने तीनही सदस्य बिनविरोध निवडून दिले होते. शिवाय गावचा निर्णय सर्व सदस्यांना बंधनकारक राहील, अशी अट देखील घातलेली होती. मात्र गावातील बिनविरोध निवडून आलेले सदस्य किशोर काटकर हे मतदानाच्या आधी दोन दिवस बेपत्ता होते. त्यांनी आपल्या पत्नीला मतदानाच्या आदल्या दिवशी सकाळी दूरध्वनी करून आपल्याला एका गाडीत टाकून नेल्याचे व खेड येथे एका ठिकाणी कोंडून ठेवले असल्याचे सांगितले, असे त्यांच्या पत्नीनी पोलिसांना सांगितले. त्यांची पत्नी यांनी दापोली पोलीस स्थानकात जाऊन आपल्या पतीचे अपहरण झाल्याची तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची तक्रार घेण्यात आली नाही यानंतर बर्‍याच वेळाने आलेल्या एका शिवसेनेच्या नेत्याने पोलीस स्थानकातूनच श्री काटकर यांना दूरध्वनी केला. यावेळी काटकर यांनी आपण स्वखुशीने खेड येथे गेलो असल्याचे पोलिसांना व त्याच्या पत्नीला सांगितले. यामुळे पोलिसांनी फिर्याद घेतली नाही.

मतदानाच्या दिवशी बुधवारी ग्रामपंचायतच्या बाहेर सकाळपासून ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळत होती. यावेळी प्रक्रिया सुरू होण्याच्या पाच मिनिटं आधी शिवसेना नेत्यांच्या गाडीतून काटकर यांना ग्रामपंचायतीच्या आवारात आणून सोडण्यात आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडून शिवसेनेच्या साक्षी गिम्हवणेकर या सरपंच म्हणून निवडून आल्या.

Related Stories

रोहा – रत्नागिरी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण, लवकरच तपासणी!

Amit Kulkarni

देवगडमधील मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Anuja Kudatarkar

‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह

NIKHIL_N

अंत्योदय, केशरीकार्डसाठी धान्य तपशील स्पष्ट

NIKHIL_N

पावसामुळे चिखलमय रस्त्याची नगराध्यक्षांकडून डागडुजी

NIKHIL_N

रत्नागिरी : लांजा तालुक्यात गवारेड्यांचा धुडगूस, दिवसाढवळ्या कळपाने वावर

Archana Banage