Tarun Bharat

दाबोळी व चिखलीतील महामार्गाला जोडणाऱया रस्त्यासाठी संरक्षक भिंतीचे काम सुरू

Advertisements

प्रतिनिधी /वास्को

आल्त दाबोळी ते चिखलीपर्यंतच्या अंतर्गंत रस्त्यासाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. 1 कोटी 60 लाख रूपये खर्चून या रस्त्याच्याकडेला संरक्षक भिंत उभारण्यात येणार असून भिंत उभारल्यानंतर या रस्त्याचे रूंदीकरणही होणार आहे. या कामाचा शुभारंभ मंगळवारी दुपारी वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते करण्यात आला.

चिखली पंचायत इमारतीसमोरील वास्को कुठ्ठाळी महामार्ग व दाबोळीतील चौपदरी महामार्गाला जोडणारा हा रस्ता बराच जुना असून तो अरूंदही आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतुक अडचणीची ठरत आहे. तसेच या रस्त्याच्या बाजुला दरी असल्याने रस्ताही असुरक्षीत आहे. त्यामुळे या रस्त्याला एका बाजूने संरक्षण भिंतीची आवश्यकता होती. या संरक्षक भिंतीचे काम हाती घेण्यात आलेल आहे. त्यानंतर या रस्त्याचे रूंदीकरण होणार आहे. जवळपास एक किलो मिटर अंतरापर्यंत या रस्त्याच्या बाजुला संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.

  काल मंगळवारी वाहतुक व पंचायतमंत्री गुदिन्हो यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून या कामाला सुरवात करण्यात आली. यावेळी जिल्हा पंचयात सदस्य अनिता थोरात, नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, चिखली पंचायतीचे उपसरपंच कमलाप्रसाद यादव, पंच रॉबर्ट फाल्काव, लिगोर मोंतेरो, ब्रह्मानंद पवार, विशाल मडगावकर, कॉस्मे मेंडिस व नागरिक उपस्थित होते. सरकारने विकासकामांना प्राधान्य दिलेले असल्याचे सांगून येत्या 2 ऑगष्टला चिखलीतील जॉगर्स पार्कच्या दुसऱया टप्प्यातील विकास कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्यची माहिती मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

Related Stories

सोलर फेरी, फ्लोटिंग जेटीमुळे पर्यटनाला अधिक चालना

Amit Kulkarni

प्रवेश शुल्क घेण्यास शाळांना शिक्षण खात्याची मनाई

Amit Kulkarni

घटक राज्य दिन ऑनलाईन साजरा करण्याचा विचार

Amit Kulkarni

आयआयटीविषयी उगे पंचायत मंडळ अनभिज्ञ कसे ?

Amit Kulkarni

एकनाथ गावकर यांच्या ‘कायदे’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

Amit Kulkarni

तासिक शिक्षकांवरही सरकारकडून अन्याय

Amit Kulkarni
error: Content is protected !!