Tarun Bharat

दाभोळमध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणी एकावर गुन्हा

10 वर्षे लंडन ते चिखलभाव प्रवास

प्रतिनिधी/ दापोली

बनावट पासपोर्टचा भारत ते लंडन जाण्या-येण्यासाठी वापर केल्याप्रकरणी तालुक्यातील दाभोळ पोलीस स्थानकात दापोली तालुक्यातील चिखलगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 एप्रिल 2011 ते 11 मार्च 2021 या कालावधीत घडली आहे.

   दापोली तालुक्यातील चिखलगाव येथील आरोपी सदानंद चाफे या नावाने प्राप्त पारपत्र (क्र. झेड. 211556) लंडन येथून 8 एप्रिल 2011 रोजी जारी करण्यात आले. या पारपत्राच्या नूतनीकरणावेळी प्राप्त अर्जाच्या चौकशीदरम्यान पारपत्रधारक सुधीर चाफेकर याने त्याचे खरे नाव सदानंद गणपत चाफे अस्ल्याचे निष्पन्न झाले. त्याने सुधीर गुणाजी चाफेकर या बनावट नावाने पारपत्र लंडन येथून प्राप्त करुन घेतले होते. त्या पारपत्रावरील नाव बनावट असल्याचे माहिती असूनही त्याने स्वतःच्या फायद्यासाठी अप्रामाणिकपणाने खरे असल्याप्रमाणे वापरात आणले. त्याद्वारे 8 एप्रिल 2011 पासून भारतातून लंडनला नोकरीनिमीत्त जाण्या-येण्यासाठी प्रवासासाठी वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामुळे दाभोळ पोलीस स्थानकात सदानंद चाफे याच्याविरोधात भा. दं. वि. कलम 420, 465, 468, 471 व इंडियन पासपोर्ट कायदा 1967 कलम 12(1) (बी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस शिपाई सिद्धार्थ माधवराव गायकवाड यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास दाभोळ सागरी पोलीस करत आहेत. 

Related Stories

दोन दिवसांत 135 कोरोना पॉझिटिव्ह

NIKHIL_N

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन तीन बळी

Archana Banage

शासकीय कर्मचाऱयांसाठी आता ‘ड्रेसकोड’

NIKHIL_N

एक घर एक रोप; वी फाॅर यू संस्थेची संकल्पना; घरपोच मोफत रोपे देणार

Anuja Kudatarkar

माऊली जत्रोत्सव 7 ,तर सातार्डा रवळनाथ जत्रोत्सव 8 नोव्हेंबरला

Anuja Kudatarkar

रत्नागिरी जिल्ह्यात आज २०१ पॉझिटिव्ह तर १३४ कोरोनामुक्त

Archana Banage