Tarun Bharat

दारुबंदीवरून देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत रूपाली चाकणकर म्हणाल्या…

पुणे \ ऑनलाईन टीम

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विरोधकांच्या या टीकेचा सोशल मीडियाच्या माध्यमातून समाचार घेतला आहे. रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातील भाषणाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस दारुबंदी उठवण्याचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देताना ऐकायला मिळत आहे.

रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहातील भाषणाचा एक जुना व्हीडिओ ट्वीटरवर शेअर करत म्हटले आहे की, दारूबंदी तो बहाणा है..”मालपाणी” निशाना है….नशा दौलत का ऐसा भी क्या ..के तुझे कुछ भी याद नहीं क्या हुआ तेरा……..” हिंदी सिनेमातील एका गाण्याच्या ओळी शेअर करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.


दारुबंदी हा तर केवळ एक बहाणा आहे. चंद्रपुरातील काही लोक अवैध दारुविक्रीच्या माध्यमातून मालपाणी मिळवतात. दारुबंदीचा निर्णय उठवल्यास ते मालपाणी बंद होईल, असा देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा आशय आहे. मात्र, ठाकरे सरकारने चंद्रपुरातील दारुबंदी उठवल्यानंतर भाजपचे नेते महाविकासआघाडीवर तुटून पडले आहेत. त्यानंतरच रूपाली चाकणकर यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

चंद्रपर जिल्ह्याच अवैद्य आणि डुप्लिकेट दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळं दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. हा अहवाल मंजूर करत ठाकरे सरकारने चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता.

Related Stories

देशात एका दिवसात 39,796 कोरोनाचे नवे रुग्ण; 723 मृत्यू

Tousif Mujawar

सैन्याला मिळाले स्वदेशी चिलखती युद्धवाहन

Patil_p

पंजाब मुख्यमंत्रिपदी चन्नी शपथबद्ध

Patil_p

खासदार ओमराजेंचा बार्शी दौरा, कोरोना बाधित 19 गावांना भेटी

Archana Banage

केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार-बदलाची चर्चा

Patil_p

आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत निष्काळजीपणा; ‘झेड’ दर्जाच्या सुरक्षेसाठी खासगी गाड्या घेऊन आले सुरक्षारक्षक

Archana Banage