Tarun Bharat

दारुसाठी पैसे न दिल्याने एकावर कोयत्याने वार

प्रतिनिधी/ सातारा

दारु पिण्यास पैसे मागितले असता ते न दिल्याने चिडून जाऊन एका युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार त्याला गंभीर जखमी केल्याची घटना साताऱयातील प्रतापसिंहनगरात घडली. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी शरद अशोक कांबळे (वय 23, रा. प्रतापसिंहनगर) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील जखमी तक्रारदार आदित्य संदीप झोंबाडे (वय 18, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) हा दि. 3 रोजी सायंकाळी त्याच्या आत्याच्या घराबाहेर बसला होता. त्यावेळी शरद अशोक कांबळे, पिंटू गायकवाड व अचित गायकवाड (सर्व रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांनी आदित्यला प्राजक्ता किराणा स्टोअरजवळ बोलावले.

यावेळी तिघांनीही आदित्यकडे दारु पिण्यासाठी 200 रुपये मागितले. आदित्यने पैसे दिले नाहीत म्हणून त्याला ते शिवीगाळ करु लागले. त्यातून भांडणे वाढत गेली आणि या तिघांनीही आदित्यला मारहाण सुरु केली व कोयता आणून आदित्यच्या डोक्यात वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.

या घटनेनंतर आदित्यला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शरद कांबळे याला अटक केली असून इतर दोन फरारी झाले आहेत. या गुन्हय़ाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बधे करत आहेत.

Related Stories

पावसाने पुलांवर पाणी ; पंढरीचे तीन महामार्ग बंद

Patil_p

तृतीय पंथीयाचा पोलीस भरतीसाठी साताऱयात सराव सुरु

Patil_p

पाटणच्या ठगाचा पुण्यातील युवतीला गंडा

datta jadhav

दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ३०.४७ टक्के

datta jadhav

सातारा : जिल्ह्यात आज लसीकरणाचा ड्राय रन

datta jadhav

कराड ते तासगाव राष्ट्रीय महामार्गासाठी सीमांकन व मोजणीचे काम तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री

Archana Banage