Tarun Bharat

दारु पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी तिघांना शिक्षा

इचलकरंजी / प्रतिनिधी

‘थर्टी फस्ट’च्या पार्श्वभूमीवर येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत 25 मद्यपी वाहन चालकांविरुद्ध खटला येथील न्यायालयात दाखल केला होता. या पैकी 3 खटल्याचा बुधवारी दिलेल्या निकालामध्ये तिघांना दोषी धरले. त्यांना 3 हजार रुपयांपासून10 हजार रुपयांपर्यंतचा दंड, दंड न भरल्यास 1 दिवसापासून 4 दिवसापर्यंतची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. हा निकाल येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज बुधवारी ठोठावला.

शिक्षा झालेल्यामध्ये गौतम अशोक बनसोडे (वय 45, रा. कोरोची) पोपट दशरथ मद्दीहळी वय 40, रा.जुना चंदर रोड, इचलकरंजी ),विनायक हणमंत जावळे ( वय 25, रा. लालनगर, इचलकरंजी) यांचा समावेश आहे.

गौतम बनसोडे याला न्यायालयाने 3 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास 1 दिवसाची सक्त मजूरी तर पोपट मद्दीहळी आणि विनायक जावळे या दोघांना न्यायालयाने प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास 4 दिवसाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

Related Stories

‘राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय माध्यमातून ग्रामीण कामगारांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार’

Archana Banage

शाहू समाधीस्थळ दुसरा टप्पा पुढील वर्षी

Kalyani Amanagi

इचलकरंजीत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ७५ जणांवर गुन्हा दाखल

Archana Banage

शिवाजी विद्यापीठातील संशोधनातून आजरा घनसाळ, काळा जिरगा वाणांच्या सुधारित जाती

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : जमिनीच्या वादातून आरेवाडीत युवकाचा खून; दोन कुटूंबातील राड्यात १६ जखमी

Archana Banage

बिबट्या नरभक्षक नाही

Archana Banage