Tarun Bharat

दारूच्या नशेत हसूर बुद्रुक येथील तरुणाची आत्महत्या

प्रतिनिधी/सेनापती कापशी

दारूच्या नशेत झाडाला गळफास घेवून हसूर बुद्रुक ता. कागल येथील एका तरुणाने आत्महत्या केली. काकासो शांताराम बोटे (वय ४०) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की बोटे हा तालुक्यातील एका साखर कारखान्यात वॉचमन म्हणून कामावर होता. मात्र तो सतत दारुच्या नशेत असायचा. त्यामुळे नवरा – बायकोमध्ये अनेकवेळा वाद होत होते. या वादातून त्याच्या पत्नीने विषारी गोळ्या व पावडर खाल्ली होती. त्यांना गडहिंग्लज ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यांची प्रकृती ठिक आहे. या घटनेची त्याला कल्पनाही दिली नव्हती. मात्र आज मंगळवारी पहाटेच बोटे याने जंगलातील शेतावर जावून जोगू झऱ्या शेजारील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुरगूड पोलिसात नोंद झाली आहे.

Related Stories

सातारकरांनो, आता गंभीर व्हावेच लागेल

Patil_p

कोरोना काळातील विद्यार्थ्यांची फी माफ करा

Archana Banage

नापास झालेच्या नैराश्यातून विद्यार्थ्यांची लॉजवर आत्महत्या

Archana Banage

शाहू समाधीस्थळ, रंकाळा सुशोभिकरणासाठी निधी देणार; मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Archana Banage

हातात तलवारी,बंदुका घेत सोशलमीडियावर स्टेटस,दोघांना अटक

Archana Banage

सत्ता ओरबाडून घेतली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही

datta jadhav