Tarun Bharat

दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारूने घेतला १४ जणांचा बळी

Advertisements

पाटणा/प्रतिनिधी

बिहारमध्ये दारूबंदी असूनही गेल्या २४ तासांत १४ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झालाय. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.बिहार राज्यातील गोपालगंज जिल्ह्यात सहा आणि बेतिया जिल्ह्यात सुमारे आठ जणांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरजेडी नेते मनोज झा यांनी विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत हेच राज्यातील ​​कटू सत्य असल्याचं झा यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी बनावट दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. मनोज झा यांनी ट्विट करून लिहिले की, “मुख्यमंत्री जी, हे तुमच्या दारुबंदीचे क्रूर सत्य आहे….पण तुम्ही काळजी करू नका आणि चिंतनही करू नका…काहीही करून निवडणूक जिंकून घ्या… बाकीचं जनतेला भोगू… कुटुंब उद्ध्वस्त होऊ द्या…तुम्हाला काय?”

Related Stories

योगी सरकारला मोठा झटका; कॅबिनेट मंत्र्याने दिला राजीनामा

Sumit Tambekar

सुर्यावरील सूक्ष्म स्फोटांचा शोध

datta jadhav

सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात बदली

Rohan_P

लोकराजाला शनिवारी आदरांजली; शाहू मिल येथे सांस्कृतिक मेजवणी

Abhijeet Khandekar

एमपीएससीच्या परीक्षा लवकर घ्या ; रोहित पवारांची ठाकरे सरकारला विनंती

Abhijeet Shinde

ट्रेनमधून विनामास्क प्रवास पडणार आता महागात! होणार 500 रुपयांपर्यंत दंड

Rohan_P
error: Content is protected !!