Tarun Bharat

दारूबंदी उठवली म्हणून बार मालकाने केली चक्क वडेट्टीवारांची आरती

Advertisements

चंद्रपूर/प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षांनंतर दारूबंदी उठली आणि दारूची दुकाने सुरू झाली. २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली होती. सरकार बदलल्यानंतर दारूबंदी पुन्हा उठवण्यात आली. दारूविक्री सुरू होताच जिल्ह्यात मद्य विक्रेत्यांनी आपआपल्या पद्धतीने हा आनंद साजरा केला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे एका बार मालकाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र बियर बार मध्ये लावून त्यांची आरती केली. वडेट्टीवार यांच्या आरतीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१५ मध्ये श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती अभियानाच्या माध्यमातून अ‍ॅड. परोमिता गोस्वामी यांनी या जिल्ह्यात दारूबंदीसाठी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली होती. ६ वर्षे दारूबंदी असल्यामुळे दारू विक्रेते अडचणीत होते. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्याने त्यांना दिसाला मिळाला आहे.

दारूबंदी उठवल्यानंतर दारू विक्रेत्यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा अच्छे दिन आले अशी भावना व्यक्त केली आहे. मागील ३ दिवसात मद्यप्रेमींनी तब्बल १ कोटींची दारू रिचविल्याची प्राथमिक माहिती आहे. याचाच आनंद म्हणून ग्रीन पार्क बारचे मालक गणेश गोरडवार यांनी बारमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र लावून त्याची आरती केली. तसेच त्या बार मालकाने जो आमचं पोट भरतो तोचं आमचा देव आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

एसटी हिंसाचारप्रकरणी पन्नासपेक्षा अधिक गुन्हे दाखल

Abhijeet Khandekar

कोरोना : सातार्‍यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

Archana Banage

केकेआरचा राजस्थानला जोरदार धक्का

Omkar B

Dahi Handi 2022: एकनाथ शिंदे म्हणाले,दिघे साहंबांचं स्वप्न पूर्ण झालं,अरूणाताईंनी सांगितल होतं…

Abhijeet Khandekar

टाकळी, मल्लेवाडी, बोलवाड ओढ्याच्या पुलांची उंची वाढवा

Archana Banage

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची प्रकृती गंभीर

Archana Banage
error: Content is protected !!