Tarun Bharat

दारूवर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना टॅक्स’

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

 केंद्र सरकारने ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला सशर्त परवानगी दिल्यानंतर दिल्लीतील दारू दुकानांबाहेर झालेली गर्दी टाळण्यासाठी दिल्ली सरकारने  दारूवर 70 % ‘स्पेशल कोरोना टॅक्स’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत आजपासून दारूवर हा कर आकारण्यात येणार आहे.

महिनाभरानंतर दारुची दुकाने उघडल्याने देशभरातील सर्वच दारू दुकानाबाहेर काल लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगला फज्जा उडाला. दिल्ली सरकारने यावर मार्ग काढत दारूवर 70 टक्के कोरोना टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला. 

आजपासून (मंगळवार) दिल्लीत दारूच्या एमआरपीवर 70% स्पेशल कोरोना टॅक्स आकारला जाणार आहे. सोमवारी रात्री उशीरा याबाबतचा आदेश दिल्ली सरकारने काढला. तसेच ज्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही त्या दुकानांना दारू विक्रीची परवानगी नाकारण्यात येईल, असा इशाराही केजरीवाल यांनी दिला आहे.

Related Stories

श्रीकांत त्यागीच्या घरावर ‘बुलडोझर’ कारवाई

Patil_p

”बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव इतक्या लवकर पवारांसारखं बोलायचं एक आणि करायचं एक असं वागतील वाटलं नव्हतं”

Archana Banage

राज्यांना ‘म्युकरमायकोसिस’वरील औषधाच्या 23,680 वायल्स

datta jadhav

कन्नडमध्ये न बोलल्याने राकेश टिकैत यांच्यावर हल्ला : आरोपींचं स्पष्टीकरण

Abhijeet Khandekar

मुंबई : धारावीत 20 नवे कोरोना रुग्ण, दोन जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

हिमाचलमध्ये खिचडी निर्मितीचा विक्रम

Patil_p
error: Content is protected !!