Tarun Bharat

दारू दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा

हिंदू जनजागृती समितीची मागणी

प्रतिनिधी/ बेळगाव

एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने आर्थिक हानी सहन करत दळणवळण बंदीचा धाडसी आणि स्तुत्य निर्णय घेतला. मात्र दुसरीकडे केवळ महसूल वाढीसाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला असून यामुळे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. यासाठी दारू दुकाने सुरू करण्याचा  निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दारू दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने केले आहे. दारू दुकाने उघडल्याने आज अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. देशात कोरोनाचा प्रभाव आणि त्यामुळे होणाऱया मृत्यूच्या संख्येत वाढ होत असताना दारू दुकानांबाहेरील ही स्थिती भयावह आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे या ठिकाणी उघडपणे उल्लंघन होत आहे. यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली आहे.

Related Stories

जेष्ठांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू

Amit Kulkarni

आप्पाचीवाडी हालसिद्धनाथ यात्रा साधेपणाने करा

Patil_p

फेरीवाल्यांचे वाढले प्रस्थ; नागरिक झाले त्रस्त

Amit Kulkarni

७ ते २९ डिसेंबर दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन

mithun mane

खैरवाड संपर्क रस्त्यावर दलदल

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील 62 गावे इकोसेन्सिटीव्ह झोनमध्येच

Amit Kulkarni