Tarun Bharat

दारू पिऊन घर पेटवणाऱयाला 3 वर्ष सक्तमजुरी

प्रतिनिधी/ सातारा

ठाकुरकी (ता. फलटण) येथील आरोपीने दारूच्या नशेत फिर्यादीला हणमंत बोडरे याला बोलवून आण असा फर्मान सोडला. परंतु हा फर्मान फिर्यादीने न ऐकल्याने आरोपीने त्याचे घर पेटवून दिले. या गुह्यातील आरोपी अंकुश लालासाहेब चव्हाण (वय 30, रा. ठाकुरकी) याला जिल्हा सत्र न्यायालयाने 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

 याबाबत मिळालेली माहिती अशी, आरोपी अंकुश हा खुनाचा प्रयत्न केल्याने जेलमध्ये शिक्षा भोगत असताना तो गावी संचित रजेवर आला होता. दि. 27 जुलै 2020 रोजी दारूच्या नशेत त्याने फिर्यादी यशवंत बाबु जाधव (वय 73, रा. ठाकुरकी) यांना हणमंत बोडरे याला बोलवून आण असे फर्मान सोडले. यावेळी यशवंत याने नकार दिला. म्हणून अंकुश याने थांब तुझे घर पेटवतो असे म्हणत पेंढय़ा लावलेले घर पेटवून दिले. यामुळे यशंवत यांच्या घरातील 25 हजाराचे साहित्य जळून खाक झाले. यांचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांनी आरोपी विरूद्ध पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले होते. या केसमध्ये एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार आरोपी अंकुश याला 3 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड आणि दंड न दिल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठवण्यात आली आहे. दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी यशवंत जाधव याला देण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

”मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे केवळ दर्शनाचा’ कार्यक्रम”

Archana Banage

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुक प्रतिबंधात्मक आदेश जारी

Archana Banage

राज्यात जिल्हानिहाय मेडिकल कॉलेज उभारणार

datta jadhav

परीक्षा घ्या अन्यथा खुर्चा खाली करा, एमपीएससी परीक्षार्थींच्या भावना तीव्र

Archana Banage

सातारा शहरातल्या बाधितांना समजेना कुठे बाधा झाली?

Patil_p

अवकाळी पावसाचा चांगलाच धुमाकुळ

Patil_p