Tarun Bharat

दावकोण पूरग्रस्त भागात द. गोवा जिल्हाधिकाऱयाची पाहणी

प्रतिनिधी/ धारबांदोडा

द. गोवा जिल्हाधिकारी ज्योती कुमारी यांनी धारबांदोडा तालूक्यातील पुर आलेल्या दावकोण भागात ग्रामस्थाच्या भेटी घेत काल शुक्रवारी दुपारी पाहणी केली.

  यावेळी त्याच्यासोबत धारबांदोडय़ाचे प्रभारी मामलेदार विमोद दलाल उपस्थित होते. पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांशी संवाद साधताना अडचणी जाणून घेतल्या. पूरसदृश्य परिस्थिती उदभवल्यास आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात करण्यात येणार असून पावसाच्या पाण्याची पातळी वाढल्यास तात्काळ उपाययोजना करण्यात येईल असे त्या म्हणाल्या. येत्या काळात जलस्रोत खात्यामार्फत संरक्षक भिंत उभारून तोडगा काढण्यात येईल असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. पूरग्रस्तासाठी नागरी पुरवठा खात्यामार्फत कडधान्याची सेवाही पुरविण्यात येणार असून वेळ पडल्यास तात्पुरते निवाऱयासाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची व्यवस्था त्वरीत करण्यात येईल असे ज्याती कुमारी यांनी सांगितले.

Related Stories

कोविड हॉस्पिटलात बळीचे शतक पार

Patil_p

’उन्हात’ करपतेय ’सौर’ फेरीबोट!

Amit Kulkarni

कुंकळ्ळीतील लढय़ासंबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

Amit Kulkarni

दहावी-बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच

Amit Kulkarni

सकाळच्या सत्रात गजबजाट संध्याकाळी मात्र शुकशुकाट

Amit Kulkarni

होंडा येथील ‘हिंदुस्तान एरोनॉटिकल’ चार वर्षापासून बंदच

Amit Kulkarni