Tarun Bharat

दावणीतून सुटलेले काही लोंक इथे तिथे फिरत आहेत

प्रतिनिधी/ सातारा

सरकार कुणाचे असो महिलांवर अत्याचार काही कमी झालेले नाहीत. या अत्याचाराच्या घटनाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आरोपी-प्रत्यारोप करून महिला अत्याचाराचा प्रश्न सुटणार नसून हा प्रश्न सामाजिकरित्या हाताळला पाहिजे. विरोधी पक्षातील महिला पदाधिकाऱयांनी यांचे भान ठेवावे. कोणी कुणाच्या दावणीला बांधलेले नाहीत. उलट जे दावणीतून सुटले आहेत ते लोक इथे तिथे फिरताना दिसत आहेत. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशअध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यावर नाव न घेता थेट शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱहे यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत टोला लगावला. महाबळेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रसंगी त्यांनी मुलीची व कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

  यावेळी उपसभापती निलम गोऱहे म्हणाल्या, महाबळेश्वर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तिला व कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. आरोपींनी तिच्यावर अत्याचार करून ती गर्भवती राहिली तरीही तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्या जन्मलेल्या मुलीला दत्तक दिल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.  त्यामुळे सदर घटनाही अत्यंत निंदनीय आहे. यामुळे त्या मुलीला न्याय मिळवून देणार आणि तिच्या पुर्नवसन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शासनाच्या सर्व योजना तिला मिळवून देण्यास मदत करणार आहे. तिचा जबाब ही नोंदविण्यात आला आहे. महाबळेश्वर येथील तपास अधिकाऱयाचीही भेट घेतली आहे. त्यांना संबंधित मुलीची आणखी वैद्यकीय माहिती मिळताच ती माहिती नोंदविण्याच्या सूचना केल्या आहेत. सदर मुलीला सरकारी वकील देऊन तिला लवकर न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करणार आहे.

पोलिसांनी महिलांच्या तक्रारी गंभीर्याने घ्याव्यात

पोलीस ठाण्यात महिला जेव्हा तक्रार दाखल करण्यासाठी येतात. त्यावेळी त्यांना आरेरावीची भाषा न करता, त्यांची तक्रार गांभीर्याने घ्यावी. महिलांना त्रास झाल्याने त्या पोलीस ठाण्यात येतात. यामुळे पोलीसांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तसेच कोणत्याही महिलेची तक्रार घेतली नाही. तर महिलांनी पोलीस अधीक्षक तसेच जे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्याकडे तसा अर्ज करावा. असे आवाहन उपसभापती निलम गोऱहे यांनी केले आहे.

Related Stories

लाडक्या बाप्पांना दिला निरोप

Patil_p

राज्यात स्थिर सरकार ठेवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी

Patil_p

गावठी पिस्तूलसह परप्रांतिय जेरबंद

Patil_p

मोठ्या विजयाची, सोप्पी गोष्ट

datta jadhav

सातारा : अवैध धंद्यांविरोधात बोरगाव पोलिसांची कारवाई

datta jadhav

निवडणुकीत गल्लीबोळात फिरणारे नेते बसले बिळात

Patil_p