Tarun Bharat

दिग्गज अभिनेत्री पॅरिस हिल्टन विवाहबद्ध

Advertisements

व्हाइट गाउनमध्ये दिसली अप्सरा

अमेरिकन गायिका, मॉडेल आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टने स्वतःचा प्रियकर कार्टर रियमसोबत विवाह केला आहे. दोघांचा विवाह एखाद्या फेयरीटेलपेक्षा कमी नव्हता. स्वतः पॅरिस या विवाहसोहळय़ात एखाद्या अप्सरेसमान भासत होती. 11 नोव्हेंबर रोजी पॅरिस विवाहबद्ध झाली असून ज्याची छायाचित्रे तिने रविवारी प्रसारित केली आहेत.

कार्टर आणि मी 15 वर्षांपेक्षा अधिक काळापासून मित्र आहोत. आम्ही एकमेकांच्या जीवनात नेहमीच सोबत राहिलो आहोत असे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे. पॅरिस आणि कार्टर यांनी फेब्रुवारी महिन्यात एंगेजमेंट केली होती. एका खासगी बेटावर सुटी घालविण्यासाठी गेले असताना हा सोहळा पार पडला होता.

कार्टरने प्रपोज केलेला क्षण अत्यंत रोमँटिक होता, माझे जवळचे मित्र आणि कुटुंबीयांना देखील त्याने आश्चर्याचा धक्का दिला होता असे पॅरिसने म्हटले आहे. मागील महिन्यात पॅरिस आणि कार्टर यांनी लॉस व्हेगासमध्ये स्वतःची बॅचलर पार्टी सेलिब्रेट केली होती. त्यानंतर अलाइस इन वंडरलँड थीमवर पॅरिसचा ब्राइडल शॉवर आयोजित कण्रयात आला होता.

पॅरिस आणि कार्टरने विवाहासाठी टॉप वेडिंग प्लॅनर मिंडी विस आणि त्यांच्या टीमला पाचारण केले होते. विवाहासाठी पॅरिसने ऑस्कर डे ला रेंटाचा व्हाइट गाउन परिधना केला होता.

Related Stories

काश्मीरमधील गुलमर्गमध्ये पर्यटकांची गर्दी

Patil_p

आसाममध्ये भाजपला धक्का; BPF ने सोडली साथ

datta jadhav

पाकिस्तानचे पंतप्रधान चीनच्या दौऱयावर

Patil_p

न्यायाधीशाच्या चौकशीची सीबीआयला अनुमती

Patil_p

इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना खूषखबर

Patil_p

पत्रकार परिषदेत का रडले चंद्राबाबू नायडू, नेमकं कारण काय?

Archana Banage
error: Content is protected !!