Tarun Bharat

दिग्गज सीईओंना मागे टाकत वेतन कमाईत महिला सीईओ अव्वल

लंडन

 जगामध्ये सर्वाधिक वेतन घेणाऱयांची चर्चा या अगोदरही विविध अहवालांमधून करण्यात आली आहे. परंतु सध्याही अशाच एका महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी(सीईओ) वेतन कमाईत आघाडी प्राप्त केली आहे.  बेट 365 च्या संस्थापक आणि सीईओ डेनिस कोट्स यांनी ही कामगिरी केली आहे. जगात आतापर्यंत सर्वाधिक वेतन कमाई करणाऱया सीईओंमध्ये अल्फाबेटचे सीईओ म्हणून सुंदर पिचाई यांचे नाव घेण्यात येत होते, त्यानंतर टेस्लाचे एलॉन मस्क, टिम कुक आणि सत्या नडेला यांचेही नाव घेतले जाते. सदर दिग्गज सीईओंच्या यादीत ब्रिटनच्या एका महिला सीईओंनी वेतन कमाईत या सर्वांना मागे टाकले असून ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मवर बेट 365 च्या संस्थापक आणि सीईओ डेनिस कोट्स यांना आर्थिक वर्ष 2020 मध्ये 4750 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. वय वर्ष 53 असणाऱया कोट्स ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत महिला म्हणून त्यांची नोंद जगभरात सर्वाधिक पॅकेज घेणाऱयांच्या यादीत झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनियेर्सच्या निर्देशांकानुसार जगातील सर्वाधिक 500 श्रीमंत लोकांचा या यादीमध्ये समावेश केला जातो. मागील एक दशकामध्ये कोट्स यांनी जवळपास 11 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली असल्याची नोंद आहे. जवळपास दोन दशकाअगोदर सुरु झालेल्या बेट 365 ला ऑनलाईन गेम बेटिंगच्या मिळणाऱया फायद्यातून कंपनीने नेटवर्थ 30 हजार कोटी रुपये प्राप्त केली आहे. यामुळे 2020 मध्ये 28,400 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे.

Related Stories

ज्युलियन असांजचे होणार अमेरिकेकडे प्रत्यार्पण

Patil_p

संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा पाकिस्तानवर घणाघात

Patil_p

अंतराळ पर्यटनाला प्रारंभ

Amit Kulkarni

कुठलेच काम न दिल्याने खटला

Patil_p

‘एस-400’चे क्षेपणास्त्र लक्ष्य हुकून कोसळल्याचा व्हिडीओ

Patil_p

अमेरिकेत ‘टिकटॉक’ बंदीला पुन्हा स्थगिती

datta jadhav
error: Content is protected !!