Tarun Bharat

दिग्दर्शकांमुळे आत्मविश्वास वाढला !

आपल्या छोटय़ाशा कारकिर्दीत राधिका मदनने वेगळ्या वाटेवरच्या भूमिकांची निवड केली. ‘पटाखा’, ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटांमधून तिने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. आता ती ‘अंग्रेजी मिडियम’मध्ये इरफान खानच्या मुलीची भूमिका करते आहे. आपण प्रत्येक भूमिकेत चांगलंच दिसायला हवं या मानसिकतेतून कलाकारांनी बाहेर पडायला हवं, असं राधिका स्पष्टपणे सांगते. या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी बरीच मेहनत करायला हवी, हे ती जाणते. दिल्लीतल्या सर्वसामान्य कुटुंबात राधिकाचा जन्म झाला. व्यावसायिक बॉलिवूडपट बघतच ती लहानची मोठी झाली. पण राधिकाला अभिनेत्रीच्या पारंपरिक साच्यात अडकायचं नाही. ती म्हणते, आपल्या हिंदी चित्रपटांमधल्या अभिनेत्री टेकडीवर उभ्या असतात. केस हवेत उडवत खाली धावत येतात. त्यामुळे अभिनेत्रींची हीच प्रतिमा आमच्यासमोर होती. पण विशाल भारद्वाज आणि वासन बाला यांच्यामुळे माझ्या मनातली अभिनेत्रीची प्रतिमा बदलली. ‘पटाखा’मधली भूमिकाही मला खूप भावली. कुशल दिग्दर्शकांमुळे मला नवा आत्मविश्वास मिळाला. तुझे केस ऍक्शन करताना उडतील, असं त्यांनी सांगितलं. आपण कसं दिसतो यापेक्षा अभिनय आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करावं हा विचार दिग्दर्शकांनीच माझ्या मनात रूजवला आणि म्हणूनच मी वेगळ्या भूमिका निभावून नेऊ शकले.

राधिका ‘अंग्रेजी मीडियम’बद्दल भाष्य करताना म्हणते की या चित्रपटातली तारिका साकारणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. कारण  तारिका माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. या भूमिकेसाठी मी बरीच मेहनत घेतली आहे. 16-17 वर्षाच्या मुलींचा आवाज काढणं सोपं नसतं. मी उदयपूरला गेले. तिथे या वयाच्या मुलींसोबत राहिले. त्यांच्या वागण्या-बोलण्याची पद्धत समजून घेतली. तेव्हा कुठे तारिका साकारता आली. 

Related Stories

ऑफिस मॅनर्स

Amit Kulkarni

मुलांना शिकवा पैशाचे महत्व

Amit Kulkarni

कलर युवर हेअर

Omkar B

असं असावं निमंत्रण

Omkar B

त्वचा उजळवणारी घरगुती उटणी

Amit Kulkarni

शिळे पदार्थ खाल्यामुळे

Amit Kulkarni
error: Content is protected !!