वार्ताहर / दिघंची
दिघंचीचे लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे ,उपसरपंच पती विकास मोरे यांच्या पॉझीटीव्ह अहवालानंतर ग्रामपंचायत च्या चार कर्मचाऱ्यांचा देखील अहवाल शनिवारी पॉझीटीव्ह आला.तसेच काही दिवसांपूर्वी दिघंचीच्या अजून एका युवा नेत्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला होता.दिघंचीमधील एकूण कोरोना बधितांची संख्या आता 139 झाली असून कोरोना मुळे तीन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्यानंतर सरपंच अमोल मोरे यांना काळजी म्हणून तासगाव मधील खाजगी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दवाखान्यातून सोशल मिडियाद्वारे सरपंच अमोल मोरे यांनी नागरिकांशी संवाद साधत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.नागरिकांनी कोरोना आजाराला गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे सांगत शासनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.विनाकारण नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच सुरक्षित राहण्याची विनंती सरपंच अमोल मोरे यांनी नागरिकांना केली आहे.
शहर बनले कोरोना हॉटस्पॉट ,आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावात
दिघंची शहर सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर येत असल्याने अन्य जिल्ह्यातील नागरिकांचा वावर दिघंची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात असतो.अशातच कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून दिघंची शहर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत निंबवडे,लिंगीवरे, राजेवाडी,विठळापूर,पुजारवाडी (दि) पळसखेल,आवळाई,गळवेवडी ही गावे देखील येतात.त्यातच दिघांची प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दोन कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचे चित्र आहे.
कोरोना चा वाढता प्रभाव पाहून व्यापारी संघटनेने पुढाकार घेऊन 8 दिवसाचा जनता कर्फ्यु देखील पाळला आहे.आत्तापर्यंत गावातील एकूण बधियांची संख्या 139 वर गेली आहे.त्यातच सरपंच,उपसरपंच पती,एक युवक नेता,यांच्यासह चार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाली आहे.तसेच आत्तापर्यंत दिघंची मधील 3 नागरिकांना कोरोना मुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना आजाराचा वाढता प्रभाव पाहता नागरिकांनी आता स्वतःहून काळजी घेण्याची गरज आहे.

