Tarun Bharat

दिलासादायकः पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रार्दुभाव आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन जीव तोड मेहनत घेत आहे. मात्र, बाधित आढळून येण्याचे प्रमाण शहरातील काही थांबेना, साखळी काही तुटेना. कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी प्रत्येकजण काळजी घेतो आहे. तरीही कोरोनाचा विषाणू न कळतपणे अलगद घरात शिरुन घरेच्या घरे बाधित करु लागला आहे. तब्बल 24 दिवसानंतर प्रथमच दि. 14 रोजीचा अहवालात पॉझिटीव्हीटी रेट हा 30 हून खाली आला आहे. 28.67 वर पॉझिटीव्हीटी रेट असून जिह्यात नव्याने 1726 जण बाधित आढळून आले तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे.  

सातारा शहर हे जिह्यातील सगळय़ात रेड झोनमधील शहर आहे. शहरातील सगळय़ाच पेठांमध्ये पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. हॉटस्पॉट भाग हा केवळ सदरबाजार, गोडोली, शाहुनगर पुरता आता मर्यादित राहिला नसून प्रत्येक पेठेत रुग्ण आढळून येत आहेत. हीच वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याठी प्रशासनाच्यावतीने पालिका प्रयत्न करते आहे. कॉन्टॅक ट्रेसिंग करुन त्यांची तपासणी करण्याचे काम केले जात आहे. परंतु साखळी काही केल्या तुटता तुटत नाही. शहरात होम आयसालेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सुमारे दोन हजाराहुन अधिक रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये एकटय़ा सातारा शहरात आहेत. तसेच मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सातारा तालुका हा जिह्यात कोरोना बाधित आणि मृत्यू होण्यामध्ये सर्वात पुढे आहे.  

24 दिवसांनी पॉझिटीव्हीटी रेट कमी झाला

दररोज सहा हजाराहून अधिक स्वॅब तपासणी केले जात आहेत. स्वॅब तपासणी करण्याचे प्रमाण कमी होत नाही. त्याच प्रमाणात पॉझिटीव्हीटी होण्याचे प्रमाण आहे. सातारा जिह्याची लोकसंख्या ही सुमारे 30 लाख एवढी आहे. त्यापैकी सध्या जिह्यातील 6 लाख 34 हजार जणांचे स्वॅब तपासणी केली आहेत. त्याच प्रमाणात 1 लाख 34 हजार 997 एवढे बाधित आढळून आले आहेत. तर 3105 जणांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे. असे चित्र असताना गेल्या 24 दिवसांत प्रथमच पॉझिटीव्हीटी रेट कमी झाला आहे. दि. 20 रोजीच्या अहवालात 6170 जणांची तपासणी केली होती. त्यापैकी 1695 पॉझिटीव्ह आले होते. तर 27.47 पॉझिटीव्हीटी रेट होता. तर दि. 14 रोजी 6020 जणांच्या तपासण्या केल्या होत्या. त्यात 1726 पॉझिटीव्ह आढळून आले होते. 28.67 एवढा पॉझिटीव्हीटी रेट होता.  

लसीकरणामध्ये येणार सुसुत्रता

लसीकरण केंद्रावर होत असलेली गर्दी पहाता आणि नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नव्याने काही सूचना दिल्या आहेत. येणारी लस ही प्रत्येक केंद्रास किती प्रमाणात आली ती लगेच जाहीर करण्यात येणार असून पन्नास पन्नास टक्केच्या प्रमाणात वाटप होणार आहे. लसीकरण केंद्रावरही नियोजन करण्याबाबतच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.  

जिह्यासाठी 27 डॉक्टर सेवेत

सातारा जिह्यात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱयांची कमतरता भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर एमबीबीएस डॉक्टरांची भरती प्रक्रिया नुकतीच राबवण्यात आली होती. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 22 डॉक्टर, ग्रामीण रुग्णालयांना 5 असे 27 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी दिली. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवरील भार हा काहीसा हलका होणार आहे. गतमहिन्यात 39 डॉक्टर नियुक्त करण्यात आले होते. तसेच जिह्यासाठी 15 व्हेंटीलेटर दिलेले आहेत. दि. 1 मे पासून 9 हजार 300 रेमडेसीवीर इंजेक्शनचा जिह्यासाठी पुरवठा झाल्याचेही त्यांनी सांगितले.  

Related Stories

सांगे तालुक्यातील सक्रिय रुग्णसंख्या १३१ वर

GAURESH SATTARKAR

छत्रपती शिवाजी संग्रहालयातील कोविड हॉस्पिटलचे काम जवळपास पूर्ण ; सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी

Archana Banage

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील 10 हजार 127 पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू

Archana Banage

Kolhapur : गळफास घेऊन कोडोलीत तरूणाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी

Patil_p

देवेंद्र फडणवीसांनी राज्यातच रहावे : बबनराव लोणीकर

prashant_c