Tarun Bharat

दिलासादायक : कोरोनामुक्तांची संख्या ८०० च्या पार

प्रतिनिधी / सातारा

जिल्हयात बाधितांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही अशी सार्वत्रिक चर्चा सुरु असली तरी प्रशासनाकडून त्याबाबत काहीही हालचाली नाहीत. गेल्या काही दिवसात दोन आकडी संख्येने रुग्ण वाढत होते तर कोरोना मुक्तीचा संख्या एक आकडय़ावर आली होती मात्र सोमवारी जिल्हय़ाला दिलासा मिळाला असून २२ जणांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांच्या संख्येने ८०० चा आकडा पार केला असून एकूण ८१३ एवढे कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान दिवसभरात ३२ तर रात्री उशिरा २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या ५७ झाली होती.

साताऱ्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळेस मंजुरी
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून राज्य शासनाने साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्यास मान्यता दिली आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्य शासनाकडून तातडीची बाब म्हणून कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मंजुरी देवून यासाठी ७५ लाख ४६ हजार १८६ इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजूरी दिली आहे. यामुळे चाचण्या गतीने होऊन उपचारही तेवढ्याच गतीने होतील.

पालकमंत्र्यांकडून स्थितीचा आढावा
सोमवारी कोरोनाच्या स्थितीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील स्थितीचा आढावा घेतला. कोरोना संसर्गामुळे जिह्यातील जी गावे अधिक बाधीत झाली आहेत, अशा गावांमध्ये आरोग्य विभागाने कॅम्प लावून गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. मोटार सायकलवरुन डबलसीट जात असले तर अशांवर कारवाई करावी. तसेच मास्क न लावता बाहेर फिरत असतील तर अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत.

जिल्हय़ातील २२ जणांची कोरोनावर मात
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेवून बऱ्या झालेल्या २२ नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडले आहे. या कोरोनामुक्तांंमध्ये कराड तालुक्यात तारुख येथील वय ७६, २२, २७, २८, ४८, ५० व २१ व २२ वर्षीय पुरुष आणि २५ व ३० वर्षीय महिला, उंब्रज येथील २६ वर्षीय पुरुष, येळगाव येथील ५३ वर्षीय महिला, बनवडी येथील २९ वर्षीय महिला, चरेगाव येथील ३२ वर्षीय महिला आणि ४ वर्षीय बालक, जखीणवाडी येथील १९ वर्षीय युवक, अमृतवाडी येथील ५० वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील ३४ वर्षीय पुरुष,सातारा तालुक्यात धावली (रोहोट) येथील ४५ वर्षीय महिला
खटाव तालुक्यातील येळीव येथील ७६ वर्षीय महिला आणि वय २४ व २६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

जिह्यातील ३२ नागरिक बाधित
रविवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित २९, प्रवास करुन आलेले १, आय. एल. आय, २ असे एकूण ३२ तर सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात पंचवीस जणांचा असा एकूण ५७ जणांचा अहवाल बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सातारा ५, कोरेगाव १, खंडाळा ३
यामध्ये सातारा तालुक्यातील जिहे येथील १७ वर्षीय युवक, कोडोली येथील ५८ वर्षीय महिला, नागठाणे येथील ४६ वर्षीय महिला, रेल्वे कॉलनी माहुली येथील ५५ वर्षीय पुरुष, अश्विनी पार्क संगमनगर येथील ४९ वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील २१ वर्षीय महिला. खंडाळा तालुक्यातील शिर्के कॉलनी शिरवळ येथील २३ वर्षीय महिला, जुना मोटार स्टँड शिरवळ येथील 58 वर्षीय महिला.

कराड तालुक्यात सतर्कतेची गरज
कराड तालुक्यात दररोज दोन आकडी संख्येने वाढत असलेली बाधितांची संख्या चिंताजनक आहे. ग्रामीण व शहरी भागात रुग्ण वाढत असून यामध्ये बाधितांच्या सहवासात येवून बाधित होणाऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाला सतर्क रहावे लागणार आह. कराड तालुक्यातील तळबीड येथील ६५ वर्षीय महिला, विद्यानगर कराड येथील ६३ वर्षीय महिला, तारुख येथील ३५ व ७० वर्षीय महिला १० वर्षाची युवती तसेच १२, १४, १५ वर्षीय युवक यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे.

फलटण ४, वाई ४, जावली ५
फलटण तालुक्यातील कोळकी येथील २३ व ४५ वर्षीय महिला, गुणवरे येथील ४९ वर्षीय महिला, आंदरुड येथील १४ वर्षीय युवक. वाई तालुक्यातील पसरणी येथील ३१, ३२, ५२ वर्षीय पुरुष, वाई शहरातील ३५ वर्षीय महिला व २८ वर्षीय पुरुष, धर्मपूरी येथील ३५ व ५२ वर्षीय महिला. जावळी तालुक्यतील मुनावळे येथील २८ व ५६ वर्षीय महिला तसेच ३६, ६५, १२ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

४११ नागरिकांचे नमुने तपासणीला
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा यथील ७०, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील ६५, वेणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील ६५, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील ३३, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील ४, ग्रामीण रुग्णालय वाई येथील ४८, कोरोना केअर सेंटर रायगाव येथील ११, पानमळेवाडी येथील १०, मायणी येथील २७, महाबळेश्वर येथील २४,दहिवडी येथील ३९, खावली येथील १५ अशा एकूण ४११ नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

जनआरोग्य योजना सर्वांसाठी
कारोना झालेल्या बाधितावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जवळपास सर्वांना आता उपचार घेता येणार आहे. तसेच लक्षणे असलेल्या व लक्षणे विरहित रुग्णांची विहित केलेल्या दिवसाला ६ मिनिटांची वॉक टेस्ट घ्यावी त्यामुळे त्यांची शारिरीक क्षमता लक्षात येईल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नियोजन भवनात झालेल्या बैठकीत सांगितले.

सोमवारपर्यंत जिल्हय़ात
घेतलेले एकुण नमुने १५२५३
एकूण बाधित १३३६
घरी सोडण्यात आलेले ८१३
मृत्यु ५५
उपचारार्थ रुग्ण ४६८

सोमवारी
एकूण बाधित ५७
एकूण मुक्त २२
बळी ००

Related Stories

“गुजरातच्या हितासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत आहेत”; सचिन सावंतांचा खोचक टोला

Archana Banage

बोरगाव पोलिसांच्या विचित्र कार्यपध्दतीने सिंधुदुर्गच्या गृहस्थाला मनस्ताप

Archana Banage

साताऱयातील तेराशे कामगारांसह रेल्वे रवाना

Patil_p

केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट दिलंय; पवारांसह…

datta jadhav

सांगली : जनावरांना घातला दुधाचा अभिषेक, आटपाडी तालुक्यात आंदोलन

Archana Banage

साताऱ्यात २२ नागरिकांना डिस्चार्ज तर ३५८ नमुने पाठवले तपासणीला

Archana Banage