Tarun Bharat

दिलासादायक : कोरोनामुक्ती दरात भारत अव्वल स्थानी

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशातील रुग्ण संख्येने 53 लाखांचा टप्पा पार केला आहे, असे असले तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. 

जागतिक पातळीवर अमेरिकेला मागे टाकत भारताने जागतिक कोविड -19  रोगमुक्तांची (रोगातून बरे झालेल्याची) संख्या सर्वात जास्त असणारा देश म्हणून स्थान मिळवले.

  • 42 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त


42 लाखापेक्षा जास्त (42,2,431) कोविड रोगमुक्त या सर्वाधिक संख्येनिशी भारत हा रोगमुक्तांची आणि रुग्णालयातून सुट्टी मिळालेल्यांची संख्या अव्वल असणारा देश ठरला आहे. कोविड-19 रोगमुक्ताच्या जागतिक पातळीवरील  एकूण संख्येपैकी 19 टक्के संख्या ही भारतातील रोगमुक्तांची असल्याचे नोंदवण्यात आहे आहे. यामुळे जागतिक पातळीवरील रिकवरी दर हा 80 टक्क्यांवर (79.28) पोहोचला आहे. 


रोगमुक्ताच्या एकूण संख्येपैकी पैकी 90 टक्के संख्या ही 16 राज्ये/ केंद्रशासित प्रदेश या मधली असल्याचे नोंदवण्यात आले आहे. नवीन रोगमुक्ताच्या संख्येपैकी 60 टक्के संख्या ही पाच राज्ये म्हणजेच महाराष्ट्र , तामिळनाडू,  आंध्र प्रदेश , कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यातील आहे.


फक्त महाराष्ट्रात 22,000 म्हणजे 23 टक्‍के आंध्रप्रदेशात 11,000 म्हणजे 12.3 टक्के एवढी दिवसभरातील रोगमुक्तांची संख्या आहे. एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी 90 टक्के संख्या ही 15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे. 


जास्तीत जास्त रुग्णांची संख्या असलेली पाच राज्ये म्हणजे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश, ही सर्वात जास्त रोगमुक्तांची संख्या असलेली ही राज्ये आहेत. 

Related Stories

प्राण्यांसोबत सेल्फी काढण्यात तरबेज

Patil_p

आरोग्य, कृषी क्षेत्रांमधील सहकार्य वाढविणार

Patil_p

उत्तराखंडात रविवारी 243 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू

Rohan_P

2 ऑक्टोबर रोजी कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश

Patil_p

लेफ्टनंट कर्नल भूस्खलनात हुतात्मा

Patil_p

गुरुकृपेने ठरली ‘हॉकी की राणी’

Patil_p
error: Content is protected !!