Tarun Bharat

दिलासादायक…कोल्हापूर जिल्ह्यात २२४० रुग्णांना डिस्चार्ज

– दिवसभरात 1574 नवे कोरोना रुग्ण, 34 जाणांचा मृत्यू

प्रतिनिधी/कोल्हापूर

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती भयंकर असली तरी शनिवारी कोल्हापूरवासियांसाठी काहिसे दिलासादायक चित्र राहिले. मागील चोवीस तासात तब्बल 2240 रुग्णांनी कोरोनावर मात करत डिस्चार्ज घेतला. तर 1574 नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचे आठवडÎाभरातील चित्र पाहिले तर रुग्णसंख्या पंधराशेच्या आसपास स्थिरावली असून मृत्य संख्येत घट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.77 टक्के इतके आहे, ही बाबही दिलासा देणारी आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या 13 963 इतकी आहे. 

आरोग्य विभागाकडून शनिवारी जिल्हÎातील 7537 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 1574 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह मिळाले. यामध्ये आजरा तालुक्यातील 34, भुदरगड 35, चंदगड 38, गडहिंग्लज 69, हातकणंगले 157, कागल 39, करवीर 276, पन्हाळा 93, राधानगरी 32, शाहूवाडी 11 आणि शिरोळ तालुक्यातील 113 जाणांचा समावेश आहे. तर नगरपालिका क्षेत्रात इंचलकरंजी येथे 135, जयसिंगपूर 34, कुरुंदवाड 2, गडहिंग्लज 22, कागल 26, हुपरी 15, पेठवडगांव 8, मुरगूडमध्ये 1 जणाचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला. कोल्हापूर शहरात 356 जणांचा तर परजिल्हा आणि परराज्यातील 81 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.

जिल्ह्यातील 3268 जणांचे आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यामध्ये 2963 जणांचे अहवाल निगेटीव्ह तर 246 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अँटीजेन टेस्टचे 2881 अहवाल मिळाले यापैकी 2368 अहवाल निगेटीव्ह तर 513 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहे. तसेच खासगी हॉस्पिटल, लॅबमधून 1418 अहवाल मिळाले यामध्ये 1418 निगेटीव्ह आणि 603 अहवाल पॉझिटीव्ह आले.

Related Stories

कोल्हापूर : राजाराम कॉलेज परिसरातील जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Archana Banage

सर्वसामान्यांची एसटीसेवा मोडण्याचा डाव

Abhijeet Khandekar

Kolhapur : प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या

Abhijeet Khandekar

Ravikiran Ingawale : वैभवशाली कोल्हापूरची शिव्या देणे हीच परंपरा आहे काय?

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 12 बळी, 560 पॉझिटिव्ह

Archana Banage

कोल्हापूर : टेस्ट वाढल्या, सलग दुसऱ्या दिवशी 1700 वर रूग्ण

Archana Banage