Tarun Bharat

दिलासादायक : जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1,386 रुग्णांना डिस्चार्ज

Advertisements

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमधून दिलासादायक बाब समोर आली आहे. आज दिवसभरात 1,386 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 63,790 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 23,357 रुग्ण जम्मूतील तर 40,433 जण काश्मीरमधील आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 632 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 79 हजार 738 वर पोहोचली आहे.  

आज आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 346 आणि काश्मीर मधील 286 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 14 हजार 696 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 8,215 आणि काश्मीरमधील 6,481 जण आहेत. 

  • 1252 जणांचा मृत्यू 


तर आतापर्यंत 1252 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 387 जण तर काश्मीरमधील 865 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 23 हजार 880 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 14 हजार 696 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत. 

Related Stories

मल्ल्या यांच्या शेअर्सच्या विक्रीतून 792 कोटीची प्राप्ती

Patil_p

दिल्लीत राष्ट्रपती राजवटीची मागणी

Patil_p

‘रेमडेसिवीर’चे उत्पादन होणार दुप्पट

datta jadhav

बूस्टर डोस 9 महिन्यानंतर

Patil_p

आयुष्यमानच्या लाभार्थ्यांना मिळणार कोरोनावर मोफत उपचार

Patil_p

विकलेल्या महिलेची समाजसेवा

Patil_p
error: Content is protected !!