Tarun Bharat

दिलासादायक बातमी : साताऱ्यात 16 कोरोनामुक्त

प्रतिनिधी / सातारा

क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक आरोग्य कर्मचारी, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथील 12 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 3 असे एकूण 16 कोरोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सध्या क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 22, सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे 13 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे 26 असे एकूण 61 जण उपचार घेत आहेत. यापैकी 60 रुग्ण लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित एका रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. 47 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह तसेच उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 6 व क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 41 एकूण 47 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

28 नागरिक विलगीकरण कक्षात

क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 17, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 11 असे एकूण 28 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 125 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 62, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 61, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

Related Stories

… तरच निर्बंध आणखी शिथील करणार : अजित पवार

Tousif Mujawar

‘त्या’ दोन मेडिकल स्टोअर विरोधात तक्रार दाखल

Archana Banage

कोरोनाबाधित जि.प. कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी विशेष समित्या स्थापन

datta jadhav

पंकजा मुंडेंची चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट, म्हणाले…

Archana Banage

सातारा जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर

Archana Banage

जिल्हय़ात कोरोनाचा वाढता कहर

Patil_p