Tarun Bharat

दिलासादायक : मंगळवारी महाराष्ट्रात 15,356 रुग्ण कोविडमुक्त!

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रातून  मागील 24 तासात 15,656 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 12 लाख 97 हजार 252 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 83.03 % आहे. 


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 8,522 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 15 लाख 43 हजार 837 वर पोहचली आहे. सध्या 2 लाख 05 हजार 415 रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी दिवसभरात 187 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 40 हजार 701 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.64 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 77 लाख 62 हजार 005 नमुन्यांपैकी 19.89 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 37 हजार 899 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 25 हजार 857 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Related Stories

कराड पालिकेच्या ताफ्यात आणखी 1 रूग्णवाहिका

Patil_p

कोल्हापूर : अज्ञाताकडून 35 हजाराचा दारूसाठा लंपास

Abhijeet Shinde

पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 1,23,967 वर

Rohan_P

शासकीय कार्यालयात जाताय लसीकरणाचे प्रमाणपत्र जवळ ठेवा

Patil_p

“मेहबूबा मुफ्तींच्या वक्तव्याला भाजपाच जबाबदार” : संजय राऊत

Abhijeet Shinde

राज्यात पुन्हा निर्बंध?, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

datta jadhav
error: Content is protected !!