Tarun Bharat

दिलासादायक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 19,212 रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 19,212 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 10 लाख 69 हजार 159 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 78.26 % आहे.

 
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात  14,997 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 66 हजार 129 वर पोहचली आहे. सध्या 2 लाख 60 हजार 363 रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी दिवसभरात 430 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 36 हजार 183 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.65 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 66 लाख 98 हजार 024 नमुन्यांपैकी 20.40 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21 लाख 35 हजार 496 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 29 हजार 947 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला जामीन नाहीच, आता सुनावणी २० ऑगस्टला

Archana Banage

शाहूवाडीत शुकशुकाट ; पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण

Archana Banage

१० वी च्या प्रश्न पत्रिकेत महिलांविरोधात परिच्छेद

Abhijeet Khandekar

अशोक मोरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड व्हावी

datta jadhav

अनिल देशमुखांनी ईडीला घातली ‘ही’ अट

Archana Banage

रविवार पेठेतील सैनिकनगर मायक्रो कंटेन्मेंट झोन

Patil_p