Tarun Bharat

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

  • मागील 24 तासात 66,836 नवे रुग्ण; 773 मृत्यू 
Advertisements


ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी देखील रुग्ण संख्या आणि मृत्यूची संख्येत वाढ सुरु आहे. अशातच काल महाराष्ट्रातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. शुक्रवारी राज्यातील तब्बल 74,045 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 66 हजार 836 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून 773 जणांनी आपला जीव गमावला.


राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 41 लाख 61 हजार 676 वर पोहचली आहे. यातील 34 लाख 04 हजार 792 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर मृतांचा एकूण आकडा 63 हजार 252 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.81 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.52 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 91 हजार 851 रुग्ण उपचार घेत आहेत. 


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 51 लाख 73 हजार 596 नमुन्यांपैकी 16.53 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 41 लाख 88 हजार 266 क्वारंटाईनमध्ये असून, 29 हजार 378 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • मुंबई : 9, 541 जणांना डिस्चार्ज! 


मुंबईतून देखील थोडी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील  24 तासात तब्बल 9,541 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 7,221 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आता पर्यंत 5,20,684 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 81,538 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Related Stories

राहुल गांधींकडून केंद्र सरकार लक्ष्य

Patil_p

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

Sumit Tambekar

जग चिंतेत मात्र चीनने तालिबान पुढे केला मैत्रीचा हात

Abhijeet Shinde

शहाबाग येथून दोन शाळकरी विद्यार्थी बेपत्ता

Patil_p

पोलिस आणि पत्रकार लोकशाहीतील जबाबदार घटक

Abhijeet Shinde

कर्नाटक राज्यातील पीयूसी द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर

Rohan_P
error: Content is protected !!