ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली आहे. मागील 24 तासात राज्यात 4 हजार 877 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 11 हजार 077 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 53 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.


राज्यात आजपर्यंत एकूण 60 लाख 46 हजार 106 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.43 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के एवढा आहे.


दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,69,95,122 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,69,799 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,01,758 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,518 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 88 हजार 729 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- पुणे शहरात 139 नवे रुग्ण
काल पुणे शहरात 139 नवे रुग्ण आढळून आले तर 284 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कालच्या दिवशी 8 जणांचा मृत्यू झाला. सध्या 225 रुग्ण क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सद्य स्थितीत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णांची संख्या 4 लाख 85 हजार 855 वर पोहोचली असून त्यातील 4,74,477 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 2,642 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 8,736 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.