Tarun Bharat

दिलासादायक! महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66%

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 6 हजार 695 नवीन कोरोनाबाधित आढळले आले. यासोबतच 7 हजार 120 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 120 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  • राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के


राज्यात आजपर्यंत एकूण 61 लाख 24 हजार 278 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.

  • सध्या 74 हजार 995 सक्रिय


दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,89,62,106 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,36,220 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,46,501 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,776 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 74 हजार 995 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

  • पुणे शहरात 244 नवे रुग्ण 


काल पुणे शहरात 244 नवे रुग्ण आढळून आले तर 139 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कालच्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला. सध्या 209 रुग्ण क्रिटिकल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सद्य स्थितीत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णांची संख्या 4 लाख 85 हजार 855 वर पोहोचली असून त्यातील 4,88,293 जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 2,448 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 8,736 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

नवाब मलिकांची प्रकृती बिघडली

Archana Banage

जिल्हा हादरला; उच्चांकी 59 बळी

Patil_p

विमानतळ मुंबईमध्येच आहे …. आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर …; मनसेचा इशारा

Archana Banage

‘होय, संघर्ष करणार..’ संजय राउतांचे ट्विट

Abhijeet Khandekar

आग्रा : सणासुदीच्याआधी वाढला कोरोना संसर्गाचा वेग; रुग्णसंख्या 1800 पार

Tousif Mujawar

२१ वर्षीय तरुणीची प्रेमवीराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!