Tarun Bharat

दिलासा : महाराष्ट्रात मागील 24 तासात 13,758 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज!

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 6 हजार 270 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 13,758 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 94 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 


राज्यात आजपर्यंत एकूण 57 लाख 33 हजार 215 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.89 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.98 टक्के एवढा आहे.


दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,96,69,693 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,79,051 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,71, 685 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,472 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 24 हजार 398 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • पुणे शहरात 4,64,983 रुग्ण कोविडमुक्त! 


पुणे शहरात सोमवारी 136 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवशी 223 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण बधितांची संख्या 4,75,990 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत 2 हजार 470 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 8,537 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Related Stories

दिलासादायक : शुक्रवारी महाराष्ट्रात 19,592 रुग्णांना डिस्चार्ज

Tousif Mujawar

कोंडगावात बिबट्याच्या हल्ल्यात पाडी ठार

Archana Banage

आई अंबाबाईला मानाचा शालू अर्पण

Archana Banage

सचिन वाझे माफीचा साक्षीदार ; कोर्टाकडून अर्ज मंजूर

Archana Banage

शिवसेनेचे नाव, चिन्ह गोठवण्याचा भाजपचा हेतू

Patil_p

बेरोजगारीमुळे तरूणांची लग्ने ठरत नाहीत- शरद पवार

Abhijeet Khandekar