Tarun Bharat

दिलासा…विक्रमी 1280 जणांना डिस्चार्ज

प्रतिनिधी/ सातारा

रोजचे कोविड बाधितांचे आकडे 800 ते 900 च्या दरम्यान येत असताना जिल्हा आरोग्य यंत्रणेने डिस्चार्जच्या बाबतीत शुक्रवारी नवा विक्रम नोंदवला. तब्बल 1280 जणांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. आजवरच्या कोरोनाच्या लढाईत हा उच्चांक आहे. कोविड बाधितांच्या रिपोर्टने आतापर्यंत 930 चा उच्चांक नोंदवला आहे. या पाठशिवणीच्या खेळात डिस्चार्ज आज पुढे होता. दरम्यान, शुक्रवारी रात्रीच्या अहवालात … इतके पॉझिटिव्ह आहेत. दिवसभरात 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

1280 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1280 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. यामुळे एकुण डिस्चार्ज 19 हजार 57 इतका झाला आहे. कोरानाने भयभीत झालेल्या लोकांना हा एक दिलासा आहे. कोरोना बरा होतो. त्यासाठी लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेतले पाहिजेत. चाचण्या केल्या पाहिजेत. दुर्लक्ष करून अंगावर काढणे योग्य नाही. यासाठी प्रशासनाने आता माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. या मोहिमेचे यश कोरोनाचे नियंत्रण करण्याला मदत करेल, असा विश्वास प्रशासनाला आहे.

24 बाधितांचा मृत्यू; बहुतांश ज्येष्ठ

जिल्हय़ात शुक्रवारी 24 बाधितांचा मृत्यू झाला. यात अपवाद वगळता सर्वजण ज्येष्ठ नागरिक आहेत.         क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे प्रतापगंज पेठ येथील 65 वर्षीय महिला, सायगाव जावळी येथील 82 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 41 वर्षीय पुरुष, पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, गोडोली सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, सोनके कोरेगाव येथील 82 वर्षीय पुरुष, कार्वे कराड येथील 70 वर्षीय महिला, गोवे सातारा येथील 56 वर्षीय महिला, गोंदवले बुद्रुयक येथील 70 वर्षीय महिला, करंजखोप कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष , वडूज येथील 68 वर्षीय महिला, कसबा पेठ फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, माणी (ता. खटाव) येथील 35 वर्षीय महिला, कामाठीपुरा सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, विसापूर (ता. खटाव) येथील 85 वषीय पुरुष, लाखनगर (ता. वाई) येथील 72 वर्षीय पुरुष, इकसार ता. वाई येथील 46 वर्षीय महिला, मारुती नगर पोवई बुध (ता. खटाव) येथील 61 वर्षीय महिला, देगाव सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गोळेवाडी (ता. कोरेगाव) येथील 60 वर्षीय महिला व 80 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ ,पाटण येथील 70 वर्षीय महिला, कुरोशी (ता. महाबळेश्वर) येथील 55 वर्षीय पुरुष अशा एकुण 24 जणांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

धामणेर मॉडेलचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक

कोरोनाच्या संसर्गाशी लढा देण्यासाठी धामणेर (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थांनी स्वतः तात्पुरत्या स्वरूपाचे रुग्णालय उभे केले आहे. असा अभिनव प्रयोग इतर गावांनी राबवण्यासारखा आहे, अशा शब्दांत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी धामणेरचा उपक्रम अन्य गावांनी राबवावा. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल, असे सांगितले आहे. गावातील कोविड बाधितांना उपचार देण्यासाठी ग्रामस्थांनी 10 बेडची गावात सोय केली आहे. गावातील एमबीबीएस डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक सेवा देणार आहेत. एखादा रूग्ण पॉझिटिव्ह आला तर त्यास उपचार देण्यात येणार आहेत. त्याची भीती कमी करण्यात येईल. तेथे पोर्टेबल ऑक्सिजन मशिनची सोय करण्यात आली आहे. जिल्हय़ात पोर्टेबल ऑक्सिजन मशिन अनेक ठिकाणी स्वयंसेवी संस्था, नागरिक देत आहेत. हाही उपक्रम जिल्हय़ात सर्व गावांमध्ये राबवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 1160 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 शुक्रवारी जिल्हय़ातून 1160 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 34, उपजिल्हा रुग्णालय कराड 21, उपजिल्हा रुग्णालय फलटण 50, कोरेगाव 126, वाई 85, खंडाळा 74, रायगांव 106,  पानमळेवाडी 212,  मायणी 103, महाबळेश्वर 55,  दहिवडी 41, खावली 45, तळमावले 26 व कृष्णा मेडीकल कॉलेज  कराड 182 असे एकुण 1160 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

Related Stories

सत्ता गेल्याने अनेकांचा जीव कासावीस : उद्धव ठाकरे

Archana Banage

Satara : जीएसटी नोकरी मिळवुन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तक्रार दाखल

Abhijeet Khandekar

ठाकरे आणि शिंदे यांच्यात होणार पहिली लढत; अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून उमेदवारी जाहीर

Archana Banage

स्टेडियम दुरूस्तीच्या कामास सुरुवात

Patil_p

अमित शहांचा मुंबई दौरा; ‘मिशन मुंबई’ महापालिकेचा करणार शुभारंभ

Archana Banage

पक्षवाढीसाठी जावलीच्या राजकारणात लक्ष घालणार

Patil_p