Tarun Bharat

दिलासा : वीस दिवसांनी बाधित वाढीचा वेग मंदावला

अचूक बातमी “तरुण भारत” ची, मंगळवार, 11 मे, सकाळी 11.15

● सोमवारी अहवालात 1,621 बाधित ● पॉझिटिव्हिटी रेट वाढताच 39.64 ● जिल्ह्यात बेडसाठी धावपळ सुरूच ● नेमके कोणत्या तालुक्यात किती ? ● सविस्तर अहवाल काही वेळातच ● मृत्यूसत्रही थांबावे हीच प्रार्थना ● घरी राहून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

सातारा / प्रतिनिधी : 

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुण्यामध्ये बाधित वाढीचा वेग मंदावत असताना सातारा जिल्ह्यात मात्र दोन हजारांच्या पटीत बाधीत वाढ सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त होत होती. रुग्णांना बेड मिळत नसल्याने व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड साठी रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल सुरूच आहेत. त्यातच सुरू असलेली बाधित वाढ भयावह ठरली आहे. मात्र 20 दिवसांनी सोमवारी रात्रीच्या अहवालात दोन हजारांचा रतीब बंद करून बाधित वाढीचा वेग मंदावला असून, 1,621 एवढ्या कमी संख्येने बाधित वाढ आल्याचा अल्प दिलासा लाभला आहे. आता मृत्यू सत्र ही थांबावे अशीच प्रार्थना जिल्हावासिय करत आहेत.

नियम पाळले तर परिस्थिती आटोक्यात 

एकीकडे पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात वेग मंदावत असताना सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाने निर्माण केलेली स्थिती सावरण्याचा आव्हान नागरिकांसह प्रशासनासमोर आहे. मुंबई-पुण्यात देखील लॉकडाऊनचे नियम करण्यात आले होते. तेथील महापालिकांनी तिथे त्या पद्धतीने अंमलबजावणी केली. आरोग्य सुविधाही वाढवल्या. त्यामुळे जिथे चांगले परिणाम दिसत आहेत. सातारा जिल्ह्यात मात्र प्रशासनाकडून नियम चांगल्या प्रकारे सांगितले जातात मात्र ते पाळले जातात की नाही हे पाहणेही गरजेचे आहे. उपाययोजनांचा वेग नंतर वाढवला गेला तोपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने कहर केला होता.

सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा कहर

सातारा शहर व तालुका हॉटस्पॉट ठरला आहे तर गेल्या संसर्गात हॉटस्पॉट ठरलेला कराड तालुका ही पुन्हा त्याच मार्गावर असताना फलटण, कोरेगाव, खटाव, माण, खंडाळा, वाई, जावली या तालुक्यामध्ये तीन अंकी संख्येने वाढ सुरू असून तिथे मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या दोन तीन दिवसात फक्त पाटण आणि महाबळेश्वर मध्ये दोन अंकी संख्येने वाढ सुरू आहे हा वेग मंदावला असला तरी कमी झालेला नाही. सातारा कराडमध्ये कोरोना बळींचे प्रमाण जास्तच आहे. या स्थितीमध्ये कोविंड रुग्णालयांमध्ये अद्यापि व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड मिळण्यासाठी रुग्णांना प्रतीक्षा यादी पाहावी लागत आहे. 

घरी राहून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

एकीकडे व्हेंटिलेटर बेड ऑक्सीजन बेड मिळत नसल्याची स्थिती पाहून जिल्ह्यात अनेकजण बाधित रुग्ण निर्भीडपणे घरीच राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार घेत आहेत आणी कोरोनामुक्त होत असल्याच्या घटना या परिस्थितीत दिलासा देणार्‍या आहेत. सोमवारी जिल्ह्याला उच्चांकी 2502 पूर्ण मुक्त त्यांच्या संख्येने दिलासा दिलेला असतानाच मंगळवारी सकाळी दिलेल्या अहवालात बाधित वाढीचा मंदावलेला वेग ही दिलासादायक ठरणार आहे. तर बाधितांची संख्या लाखाच्या वर गेलेली असली तरी कोरोनामुक्तीने लाखाचा आकडा पार केल्याने लढाईचे बळ वाढलेले आहे.
सोमवारी रात्री अहवालात 1,621 बाधित  गेल्या रविवारी रात्रीच्या अहवालात बाधित वाढीने नवा उच्चांक नोंदवला. तब्बल 2,502 जणांचे अहवाल बाधित आल्याने आता स्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. तेव्हापासून सातत्याने बाधित वाढीचा हा उच्चांक मोडला गेला नसला तरी दोन हजारांच्या पटीत सुरू असलेले बाधित वाढ जिल्हावासीयांना छळत आहे. रविवारी रात्रीच्या अहवालात देखील 2,280 एवढ्या संख्येने बाधित समोर आले आहेत. मात्र तब्बल वीस दिवसांनी सोमवारी आलेल्या अहवालाने थोडासा दिलासा दिला आहे. बाधित वाढ आणि वाढता मृत्युदर रोखायचा कसा यावर आता काम करावे लागणार आहे. 

संसर्गाच्या तडाख्यातून जिल्हा सावरावा लागेल बाधित वाढत असल्याने एकीकडे हॉस्पिटल वाढवण्याचे काम सुरू आहे. उपाय योजना सुरू आहेत. तपासणीही वाढविण्यात आलेले आहेत.  तरी देखील जिल्ह्यातील बाधित वाढ, वाढता मृत्यू दर थांबलेला नाही हे नेमके कशामुळे आणि त्यावर काय उपाय करायचे याचा प्रशासनाला आरोग्य विभागाला विचार करावा लागणार आहे.

पॉझिटिव्हिटी रेट 39.64 टक्के 

सोमवारी रात्रीच्या अहवालात 1,621 जणांचा अहवाल बाधित आला आहे. या अहवालानुसार एकूण  4 हजार 89 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1,621 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 39.64 असा आहे. 

वाढ रोखणार कशी यावर बोला
जिल्ह्यात बाधित वाढीतील उच्चांक, कोरोना बळीच्या आकड्यांमध्ये उच्चांक परिस्थितीचे गांभीर्य वाढवू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला सावरण्यासाठी उपाय योजना वाढवून संसर्ग रोखण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा हे निश्चितच. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोक स्वतः पुढाकार घेऊन संसर्ग वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करू लागलेत त्यासाठी अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू, पूर्ण संचारबंदी लोक स्वयंस्फूर्तीने पाळू लागले आहेत. तरीदेखील वाढणारे बाधितांचे काकडी बुचकळ्यात टाकत आहेत. त्यामुळे प्रशासनाने संसर्ग वाढ रोखण्याची कोणती उपाययोजना आहे यावर बोलायला हवे.

सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 6,05,388 एकूण बाधित 1,25,472   एकूण कोरोनामुक्त 1,0,0092   मृत्यू 2,917 उपचारार्थ रुग्ण 22,435 
सोमवारी जिल्हय़ात बाधित 2,280मुक्त 2,502 बळी 30

Related Stories

किसनवीरकडून गतवर्षीचे ऊस बिल थकीत; संतप्त शेतकऱ्यांकडून निदर्शने

Abhijeet Khandekar

कराडचा अमिर शेख एक वर्षासाठी स्थानबद्ध

Patil_p

अल्पवयीन युवतीवर अत्याचार; सावत्र पित्यास अटक

Patil_p

मलकापुरात कंटेनमेंट झोनची आयुक्तांनी केली पाहणी

Patil_p

कराडला 32 एसटी कर्मचारी बडतर्फ

Patil_p

वाहतूक शाखा प्रमुखांची रोज अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

Amit Kulkarni