Tarun Bharat

दिलीप परुळेकरांचे बंड झाले थंड!

प्रदेश भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती : फडणवीस यांची यशस्वी मध्यस्थी,एक वादळ शमले, दोघांचे काय?

प्रतिनिधी /पणजी

साळगाव मतदारसंघाची उमेदवारी जयेश साळगावंकर यांना दिल्याने नाराज झालेले दिलीप परूळेकर यांची भाजपच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर परुळेकरांचा बंड झाला थंड. भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी फळाला आली. भाजपमधील परेकरांचे हे एक वादळ शांत करण्यात भाजप यशस्वी झाला असला तरी पणजी आणि मांद्रे मतदारसंघातील वादळ अजूनही घोंगावत आहे. निवडणुकीपर्यंत या वादळांचा वेग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रभारी देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत दिलीप परूळेकर यांना भाजप प्रदेश उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले.

परुळेकर नाराज बनल्यानंतरही त्यांनी पक्ष सोडला नाही. पक्षासोबतच राहिले, केवळ निवडणुकीत उमेदवारी मिळणेच सर्व काही नाही. परुळेकर अनेक वर्षे पक्षात राहून त्यांनी पक्षाचे कार्य केले आहे. जो पक्षात राहून प्रामाणीकपणे कार्य करतो त्याचा पक्ष नेहमीच सन्मान करतो. परुळेकर  नेहमी पक्षासाठी कार्य करीत रहातील येत्या निवणूकीत त्यांचा पक्षासाठी मोठा फायदा होईल असा विश्वास तानावडे यांनी व्यक्त केला.

पक्षाने आपली उपाध्यक्षपदी नियुक्ती केली त्यासाठी आपण पक्षाचा आभारी आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती निश्चितपण पार पाडणार. मध्यंतराच्या काळात आपण नाराज झालो होतो मात्र पक्ष सोडून दुसऱया पक्षात जाण्याचा विचार कधीही केला नव्हता. गेल्या तीस वर्षापासून आपण पक्षाशी निगडीत आहे. साळगांव मतदारसंघात पक्ष वाढविण्यासाठी दिवसरात्र कार्य केले आहे. असेही परुळेकर म्ङणाले.

येत्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संघटीत करून त्यांच्या सोबत पक्षाच्या विजयासाठी कार्य करणार असेही परुळेकर यांनी सांगितले. पर्सेकरांनी पक्ष सोडला ते खूप मनाला लागून गेले. त्यांच्यात आणि पक्षात काय झाले हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण ज्यांनी पक्षाला तळागाळातून वर काढले त्यांनी असे सहज सोडून जाणे हे मनाला पटत नाही, असेही परुळेकर म्हणाले.

Related Stories

मडगावात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे तीन तेरा

Omkar B

पावसाची रिपरिप आणि आठवडा बाजाराची तारांबळ

Patil_p

सागर नाईक मुळेच्या ‘भारत भूंय’ व्हीडीओ व पेंटींगचा आज अनावरण सोहळा

Amit Kulkarni

पर्वरीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

Omkar B

खडपाबांधचा रस्ता हॉटमिक्स करुन आमदारांनी स्वार्थ साधला

Amit Kulkarni

अखेर पावसाची हुलकावणी

Amit Kulkarni