Tarun Bharat

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर तोडफोड; ‘आप’चा भाजपवर निशाणा

Advertisements

ऑनलाईन टीम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर आज तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. केजरीवाल यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांनीच मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे म्हणणे आहे. तसेच, तोडफोड करणाऱ्या महिला भाजपच्या नेत्या होत्या हे भाजपाने मान्य केलं असल्याचंही आम आदमी पार्टीने म्हटले आहे.

या प्रकारानंतर चौकीदारांना कॅमेऱ्यांची कसली भीती? असा टोला ‘आप’ ने भाजपाला लगावला आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील आप वर पलटवार केला असून आम आदमी पार्टीचे हे घाणरेडे राजकारण असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अगोदरपासूनच बरेच कॅमेरे आहेत. तरीही धरणे आंदोलन करणाऱ्या महिला नगरसेविकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावले गेले. हा कोणत्याही महिलेच्या वैयक्तिक बाबींवर हल्ला असून ‘आप’ चा महिला विरोधी चेहरा पुन्हा उघड झाला आहे. हे अतिशय लाजीरवाणं आहे, असा पलटवार भाजपने केला आहे.

Related Stories

राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार हवा!

Amit Kulkarni

नेपाळला जाण्याचा विचार करतायं? असे तयार करा प्रवासाचे बजेट

Abhijeet Khandekar

मुख्यमंत्र्यांचा एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला; म्हणाले, …याचं भान ठेवा

Abhijeet Shinde

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 30 टक्क्यांनी घटले

tarunbharat

राज्यसभेतील सहा रिक्त जागांसाठी ‘या’ दिवशी होणार पोटनिवडणूक

Abhijeet Shinde

वस्त्रोद्योगाला गती, शेतकऱ्यांना आधार

Patil_p
error: Content is protected !!