Tarun Bharat

दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये 800 डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

रोग कोणता ही असेल तर त्यावर उपचारासाठी डॉक्टरांच्या मदतीने शर्तीचे प्रयत्न केले जाऊ शकतात. मात्र एखाद्या संसर्गजन्य आजारात मोठ्या प्रमाणात डॉक्टरच बळी पडत असतील तर मात्र त्या संसर्गावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असते, हे मात्र निश्चित.अशीच स्थिती सद्या देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली येथे आहे.

राजधानी दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांमध्ये झपाट्याने कोरोना संक्रमण होत आहे. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या 5 हॉस्पिटल्समध्ये सुमारे 800 हून अधिक डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आढळले असून या डॉक्टरांच्या संपर्कात आलेले डॉक्टर्स, स्टाफ, आरोग्य कर्मचारी देखील आयसोलेशनमध्ये आहे.हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअप, OPD आणि अनावश्यक सर्जरी रोखण्यात आल्या आहेत.

रुग्णालयांमध्ये सर्वात वाईट स्थिती दिल्लीच्या एम्समध्ये आहे. सूत्रांनी सांगितले की एम्समध्ये काम करणारे सुमारे 350 निवासी डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत. हा आकडा फक्त कोविड पॉझिटिव्ह निवासी डॉक्टरांचा आहे, जर फॅकल्टी, पॅरामेडिकल कर्मचारी जोडले तर हा आकडा खूप मोठा होईल. दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. 9 जानेवारी रोजी दिल्लीत कोविडचे 22 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले, तर 17 लोकांचा मृत्यू झाला. चिंतेची बाब म्हणजे पॉझिटिव्हिटी दर 25% च्या जवळपास पोहोचला आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक 4 नमुन्यांपैकी 1 नमुना पॉझिटिव्ह येत आहे.

Related Stories

देशात चोवीस तासात 34,884 नवे रुग्ण

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये सैन्य ठरले संकटमोचक

Patil_p

बोहल्यावर चढलेल्या नक्षली महिलेला लग्नमंडपातून अटक

datta jadhav

देशात संक्रमणाचा वेग मंदावला

datta jadhav

Sangli; संजयनगरमधील गुंडाचा भोकसून खून

Abhijeet Khandekar

ईईएसएलचे 1.6 कोटी स्मार्ट एलईडी दिवे लावण्याचे ध्येय

Patil_p
error: Content is protected !!