Tarun Bharat

दिल्लीतील कोरोना : दीड महिन्यानंतर समोर आले सर्वात कमी नवे रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी नव्या रुग्णांची नोंद झाली. बुधवारी मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार दिल्लीत मागील 24 तासात 3,846 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 235 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात तब्बल 9,427 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 


मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत बाधितांनी 14.6 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 06 हजार 719 वर पोहचली असून त्यातील 13 लाख 39 हजार 326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 22,346 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 45 हजार 047 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 84 लाख 74 हजार 059 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 46,785 आरटीपीसीआर टेस्ट आणि 19,788 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. या आकडेवारी नुसार, दिल्लीत कोरोना संसर्गाचा दर 7.61 % तर मृत्यू दर 1.59 % इतका आहे. सद्य स्थितीत राज्यात 56,732 झोन आहेत. तर 769 कंट्रोल रूम आहेत. 

  • लसीकरणाचा डाटा 


दिल्लीत मागील 24 तासात 1 लाख 5 हजार 540 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 88,494 जणांना पहिला डोस 17,046 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 48 लाख 21 हजार 325 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

Related Stories

गुढीपाडव्याला प्रवाशांची होणार गैरसोय

Patil_p

भारताला मंदीचा धोका नाही !

Patil_p

कुलगाममध्ये चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Amit Kulkarni

काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये पेटला संघर्ष

Patil_p

आता मेरठमध्ये होणार पुरातत्व विभागाचे नवीन कार्यालय

Tousif Mujawar

दहशतवाद संपेपर्यंत शांत बसणार नाही!

Patil_p