Tarun Bharat

दिल्लीतील कोरोना : या वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 89 नवे रुग्ण

  • ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या 2000 च्या खाली 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


राजधानी दिल्लीत मागील 24 तासात कोरोनाचे 89 नवे रुग्ण आढळून आले. जे या वर्षातील एका दिवसातील सर्वात कमी रुग्ण आहेत. तर या संसर्गामुळे काल एका दिवसात 11 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 173 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीतील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजारच्या खाली आली आहे. 


आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या ताज्या माहितीनुसार दिल्लीत मागील 24 तासात 89 नवे रुग्ण समोर आल्यानंतर बाधितांची एकूण संख्या 14 लाख 32 हजार 381 वर पोहचली आहे. तर 173 जणांना डिस्चार्ज दिल्याने कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून 14,05,460 इतकी झाली आहे. दिल्लीतील संसर्ग दर 0.16% इतका आहे. दरम्यान, कालच्या दिवशी 11रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढून 24,925 वर पोहोचला आहे. 


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 521 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 14 लाख 00 हजार 161 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 24,668 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राजधानीतील मृत्यूचे प्रमाण 1.74 टक्के इतके आहे. मृतांच्या संख्येत देशात दिल्ली चौथ्या स्थानावर आहे.


ताज्या आकडेवारी नुसार, मागील 24 तासात 11,662 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 10,043 जणांना पहिला डोस 1619 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 65 लाख 21 हजार 959 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

Related Stories

लिबियात सात भारतीयांचे अपहरण

datta jadhav

कर्नाटक : काँग्रेसची भाजपविरोधात निषेध रॅली

Archana Banage

देशात बलात्काराचं सत्र सुरूच, महिला कॉन्स्टेबलवर तिघांनी बलात्कार करत रेकॉर्ड केला व्हिडिओ

Archana Banage

45 वर्षांवरील सर्वांना 1 एप्रिलपासून लस

Patil_p

सीबीएसई दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

‘युपीआय डाऊन’मुळे अडचणींचा सामना

Patil_p