ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात केवळ 623 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी 18 मे रोजी 607 रुग्ण आढळून आले होते. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्येत घट झाली असून 10 हजारच्या आसपास आली आहे.


मंगळवारी आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 62 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा दर 0.88 टक्के इतका झाला आहे. सोमवारी हा दर 0.99 टक्के इतका होता. तर दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 26 हजार 863 वर पोहचली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 1,423 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 13 लाख 92 हजार 386 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 24,299 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सद्य स्थितीत 10 हजार 178 वर रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 93 लाख 73 हजार 093 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 46,715 आरटीपीसीआर टेस्ट आणि 24,098 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.