Tarun Bharat

दिल्लीतील रुग्णालयात होणार केवळ दिल्लीवासियांवरच उपचार : केजरीवाल

ऑनलाईन टीम / दिल्ली : 


दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता दिल्लीतील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात आता केवळ दिल्लीवासियांवरच म्हणजेच स्थानिक रुग्णांवर उपचार करण्यात येतील अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 


ते म्हणाले, दिल्लीत आरोग्य व्यवस्थेच्या समिक्षेसाठी आम्ही पाच वरीष्ठ डॉक्टरांची समिती स्थापन केली होती. त्यांनी देखील जो पर्यंत दिल्लीवर कोरोनाचे संकट आहे, तोपर्यंत सर्वात प्रथम दिल्लीतील खाजगी आणि सरकारी रुग्णालये स्थानिक रुग्णांसाठी आरक्षित ठेवावीत असा सल्ला दिला होता. तसेच 90 टक्के नागरिकांनी देखील या संकट काळात दिल्लीतील लोकांवर उपचार करावेत अशी मागणी केली होती. त्यामुळेच आता दिल्लीतील रुग्णालयात स्थानिक रुग्णांवर उपचार केले जातील.

तसेच इतर शहरातून दिल्लीमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झाल्यास त्यांना खाजगी रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  

पुढे ते म्हणाले, सोमवार पासून दिल्लीच्या सीमांवर लावण्यात आलेले निर्बंध उठवले जाणार असून या सीमांवरून सामान्यपणे वाहतूक सुरू केली जाईल. तसेच दिल्लीतील मॉल, धार्मिक स्थळे केंद्र सरकारने दिलेल्या निर्दशानुसार सुरू केली जातील.

मात्र, हॉटेल आणि बॅंक्वेट बंदच ठेवली जाणार असून भविष्यात गरज पडल्यास या जागी रुग्णालायांसारख्या सुविधा उपलब्ध करुन  वापरण्यात येतील असे ही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

Related Stories

बैसाखी : पहिल्यांदाच सर्वत्र शुकशुकाट

Patil_p

कमर्शियल सिलिंडर 43 रुपयांनी महाग

Patil_p

पंजाबमध्ये एका दिवसात 1,793 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

‘टू फिंगर’ टेस्ट करू नका!

Patil_p

कोरोना मृत्यूंसाठी भरपाई निश्चित करा!

Patil_p

अण्णाद्रमुककडून पोटनिवडणुकीसाठी रामलिंगम यांना उमेदवारी

Patil_p