Tarun Bharat

दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये आणखी एका आठवड्याची वाढ

  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत वाढत असलेली कोरोनाची रुग्ण संख्या लक्षात घेत केजरीवाल सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, दिल्लीत आणखी एक  आठवड्याभरासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत  ट्विटरवरून माहिती दिली आहे. 


केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिल्लीत लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढवले आहे. नव्या आदेशानुसार आता दिल्लीत 10 मे च्या सकाळी 5 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. 


दरम्यान, राजधानी दिल्लीत दुसऱ्यांना लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी 25 एप्रिल रोजी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती. 


सद्य परिस्थिती पहाता राजधानीत रुग्ण वाढीचा वेग वाढला आहे, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोरोना साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.  

Related Stories

वन्यप्राण्यांच्या मांसाचे वाटप करताना शिकारी सापडले रंगेहाथ

Abhijeet Khandekar

सांगली जिल्हा पूरस्थिती Live : अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवून अडीच लाख क्युसेस

Abhijeet Shinde

काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदी पवनकुमार बन्सल

datta jadhav

शेतकऱयांच्या मदतीसाठी सरकारचा पुढाकार

Patil_p

अफगाणमधून 392 भारतीय मायदेशी

Patil_p

माणूस शंभर वर्षे जगावा ही ग्रामपंचायतीची भूमिका असावी- आदर्श सरपंच भास्कर पेरे-पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!