Tarun Bharat

दिल्लीतील विद्यार्थ्यांना शिकविणार विदेशी शिक्षक

Advertisements

शासकीय मुलांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्ली शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱया शाळांमधील विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळणार आहे. दिल्लीच्या मुलांचे शिक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावरील असणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी काढले आहेत.

दिल्ली शिक्षण मंडळासोबत इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डाचा करार झाला आहे. दिल्ली शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱया सर्व शाळांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळणार आहे. दिल्लीवासीयांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे केजरीवाल म्हणाले.

शासकीय शाळांमधील स्थिती यापूर्वी कशी होती हे सर्वजण जाणतात. दिल्लीत आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यावर येथील शासकीय शाळांमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. आमच्या देशात दोन प्रकारच्या शिक्षण प्रणाली आहेत. एक श्रीमंतांच्या मुलांसाठी तर दुसरी प्रणाली गरीबांसाठी आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते स्वतःच्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिकवत आहेत. तर गरीबांची मुले शासकीय शाळांमध्ये शिकतात. इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्डासोबत करार झाल्यावर दिल्लीच्या गरीब मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण प्राप्त होणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.

Related Stories

मध्यप्रदेशचे जलसंपदा मंत्री तुळशीराम सिलावट यांचा राजीनामा

datta jadhav

रुग्णवाढ धक्कादायक

Patil_p

पंजाब : मनप्रीत सिंह बादलसह 1310 पॉझिटिव्ह रुग्ण

Rohan_P

लॉक डाऊन हा कोरोनाचा फैलाव रोखण्यावर उपाय नाही : राहुल गांधी

prashant_c

शाहू महाराजांचा गौप्यस्फोट: संभाजीराजेंनी अपक्ष लढाव यासाठी फडणवीसांची खेळी

Abhijeet Shinde

बिगर विमा क्षेत्रातून प्रीमियममधून 17 हजार कोटी प्राप्त

Patil_p
error: Content is protected !!