Tarun Bharat

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला जावलीच्या युवकांचा पाठिंबा

Advertisements

वार्ताहार/ आनेवाड़ी

 केंद्र सरकारने आणलेल्या कृषि कायद्याच्या माध्यमातून शेतकयांचे नुकसान होणार असून या कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातुन अनेक शेतकरी दिल्ली मधे गेल्या दोन महिन्यापासून शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करीत असून,याला दिवसेंदिवस पाठिंबा मिळत असून अनेक राज्या तुन शेतकरी मोठय़ा संख्येने दिल्ली कड़े धाव घेत आहेत मात्र ज्याना जाने शक्य नाही अश्या शेतकयांनी आपल्या गावातुन,शेतातून य्या कायद्याला विरोध करायला सुरुवात केली आहे,यात तरुण शेतकरी देखील मागे नसून आपल्या हटके व अनोख्या पद्धतीने त्यांनी य्या आंदोलना मधे आपला सहभाग दिला आहे

   या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जावली तालुक्यातील आनेवाड़ी गावातील युवा शेतकरी आकाश हरिश्चन्द्र फरांदे याने आपल्या दुचाकी वर आमचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा अश्या प्रकारे रेडियम च्या साहय्याने फलक लिहून राजधानी दिल्ली तील शेतकरी वर्गाला आपला पाठिंबा दर्शविला आहे,त्याच्या य्या कृती तुन प्रेरणा घेत गावा सह परिसरातील अनेक युवक अश्या माध्यमातून आपला सहभाग देवू लागले आहेत,आकाश फरांदे याचे आजोबा कै. लक्ष्मण फरांदे हे स्वतंत्रता संग्रामा मधे सहभागी होते, त्याच प्रेरणेतून आकाश  देखील स्वतः शेती करीत या शेतकरी आंदोलनात अनोख्या पद्धतीने सहभाग दिला आहे.

येणाया काळात केंद्र सरकारने कायम स्वरूपी कृषि कायदा मागे न घेतल्यास दिल्ली तील या आंदोलना मधे आपल्या युवक मित्रांच्या साथीने सहभागी होणार असल्याचे आकाश फरांदे याने सांगितले,त्यासाठी दिल्ली ला दुचाकी वरुन जावे लागले तरी जाणार असा दृढ़ निश्चय त्याने व्यक्त केला

Related Stories

Satara : रेल्वे स्टेशन जवळ सापडला एका इसमाचा मृतदेह

Abhijeet Khandekar

हॉटेल चालकाने उकळतं पाणी ओतून केली 2 भिकाऱ्यांची हत्या

datta jadhav

दस्त नोंदणीचे कामकाज शनिवार व रविवारी सुरू राहणार-मुद्रांक जिल्हाधिकारी

Abhijeet Khandekar

चंद्रभागेवरील भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू

Omkar B

दरेकरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस मारले जोडे

datta jadhav

१२ डिसेंबरला जिल्ह्यात लोक अदालतीचे आयोजन

Archana Banage
error: Content is protected !!