Tarun Bharat

दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा उद्यापासून भाविकांसाठी खुला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिने बंद असलेला दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा उद्यापासून (दि. 6) भाविकांसाठी खुला होणार आहे. दर्ग्याचे प्रभारी सय्यद आदिब निझामी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

निमाझी म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात  दर्गा बंद होता. अनलॉक-4 मध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामध्ये काही अटी, शर्थींसह दर्गा खुला करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार उद्यापासून दर्गा सुरू होईल. सोशल डिस्टन्सिंगचे तिथे पालन केले जाईल. मास्क बंधनकारक असणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अन्य उपाययोजनाही करण्यात येणार आहेत, असेही निमाझी म्हणाले. 

Related Stories

सायना नेहवालने केला भाजपमध्ये प्रवेश

prashant_c

माजी केंद्रीय गृहमंत्री बुटा सिंग यांचे निधन

Patil_p

व्हिसावरील निर्बंध शिथिल

Patil_p

राज्यातून चौघांना संधी

Patil_p

सैन्याकडून चुकून झालेल्या गोळीबारात 2 जण जखमी

Patil_p

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज

Patil_p