Tarun Bharat

दिल्लीतून कोल्हापूरला आलेल्या 10 तबलिगींचा शोध

Advertisements

निजामुद्दीनमधील मकरजमधील तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमास 19 जणांची उपस्थिती : परतलेल्या दहा जणांना सीपीआर, आयजीएमध्ये केले दाखल

 प्रतिनिधी/कोल्हापूर

राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे असणाऱया मरकजमध्ये झालेल्या तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हय़ातून 19 व्यक्ती गेल्या असल्याचे स्पष्ट झाले असून त्यापैकी 10 व्यक्ती कोल्हापूरमध्ये परतल्या आहेत. त्यांचा पोलिसांच्या मदतीने शोध घेण्यात आला आहे. या सर्वांना तातडीने इन्स्टिस्टय़ुशनल कॉरंटाईन (संस्थात्मक अलगीकरण कक्ष)  करण्यात आले आहे. उर्वरीत 9 व्यक्ती दिल्लीसह हरियाणा आणि हैदराबाद येथे कॉरंटाईनमध्ये आहेत. ही माहिती बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

तबलिगी जमातीचा धार्मिक कार्यक्रम दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मरकजमध्ये आयोजित करण्यात आला होता. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला जनता कर्फ्यु आणि नंतर 21 दिवसांचा लॉक डाऊन लागू केल्यानंतर देशातील सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांससह सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार स्टे होम, सिक्युअर होम सुरू असताना दिल्लीतील मरकजमध्ये तबलिगी  जमात या धार्मिक शिक्षण देणाऱया संस्थेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांपैकी दीड ते दोन हजार लोक देशात लॉक डाऊन असताना एकत्रित असल्याची माहिती पुढे आली. त्यांच्यातील काहींना कोरोनाच्या संदर्भातील प्राथमिक लक्षणे दिसल्याने दिल्ली प्रशासनाने मरकजमधील सर्व व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. दरम्यान, देशात लॉक डाऊन असताना, सोशल डिस्टटींगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असताना मरकजमध्ये दीड दोन हजार व्यक्ती एकत्रित राहत असल्याचे आढल्यानंतर देशभर खळबळ उडाली. दरम्यान, या मकरजमध्ये काही विदेशीही व्यक्ती होत्या. तसेच इतर व्यक्तींपैकी काही व्यक्ती देशातील विविध राज्यात कार्यक्रमासाठी गेल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार झाल्याचा संशय व्यक्त होत असताना या तबलिकी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी कोल्हापुरात व्यक्ती गेल्या होत्या काय? असा सवाल उपस्थित होता.

कोल्हापुरातील 19 व्यक्तीचा शोध

दरम्यान,  दिल्लीच्या प्रशासनाने मंगळवारी (31 मार्च) जिल्हा प्रशासनाला मरकजमधील धार्मिक कार्यक्रमासाठी कोल्हापुरात गेलेल्या 21 व्यक्तींच्या नावाची यादी पाठविली. पण प्रत्यक्षात शोध घेतला असता कोल्हापुरातून 19 व्यक्ती या कार्यक्रमाला गेल्याचे स्पष्ट झाले.  त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 19 पैकी 10 व्यक्तींचा शोध घेतला. या सर्वांशी संपर्क आणि बोलणे झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून या दहा व्यक्तींना कोल्हापुरातील सीपीआर आणि इचलकरंजी आयजीएम हॉस्पिटलमध्ये इन्स्टिस्टय़ुशनल कॉरंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. पुण्यातील प्रयोग शाळेत या सर्व दहा जणांचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

उर्वरीत 9 व्यक्ती इतर राज्यात  इन्स्टिस्टय़ुशनल कॉरंटाईन

19 पैकी 10 व्यक्ती कोल्हापुरात  इन्स्टिस्टय़ुशनल कॉरंटाईन असल्या तरी उर्वरीत 9 व्यक्ती या दिल्ली, हरियाणा आणि हैदराबाद आदी राज्यात आहेत. त्यांना त्याच ठिकाणी  इन्स्टिस्टय़ुशनल कॉरंटाईन करण्यात आले आहे.

अन्य 21 जण दिल्लीत कॉरंटाइन

दरम्यान, दिल्ली येथे तबलिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या जिह्यामधील आणखी 21 जणांना दिल्ली शासनाने तेथेच इन्स्टिस्टय़ुशनल कॉरंटाईन कक्षात ठेवले आहे, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

70 हजाराहून अधिक व्यक्ती होम कॉरंटाईन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेश, परराज्य आणि परजिल्हय़ातून कोल्हापुरात आलेल्या तब्बल 70 हजाराहून अधिक व्यक्तींची तपासणी करून त्यांना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांच्या नोंदी ग्राम समिती आणि प्रभाग समितीकडे आहेत. या सर्वांशी दररोज संपर्क करून त्यांची वैयक्तिक तपासणी केली जात आहे. सहा हजाराहून अधिक व्यक्तींचा चौदा दिवसांचा होम कॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे, असेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.

परदेशी, परराज्यातील आलेल्यांची माहिती प्रशासनाला कळवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने घरीच राहून आपल्या आणि आपल्या कुटुंबांसह समाजाचीही काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. आपल्या गावात, आपल्या भागात जर कुणी परदेशातून, परराज्यातून, परजिल्हय़ातून आले असेल तर त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. नागरिकांनी समाजाचे आरोग्य राखण्यासाठी स्वतः स्वयंसेवक बनावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले.

Related Stories

शिवप्रेमींची पारगडावर पदभ्रमण

GAURESH SATTARKAR

रात्री दिवेच बंद करा; उपकरणे सुरूच ठेवा : महापारेशन

prashant_c

अशोक चव्हाणांच्या घरालगतच्या भागात कोरोनाचे १० रूग्ण

datta jadhav

उद्धव ठाकरेंसह 9 जणांनी घेतली आमदारकीची शपथ

datta jadhav

चीनकडून पाच दिवसात महाराष्ट्रात 40,300 सायबर हल्ले

datta jadhav

चितळे उद्योग समुहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळेंचे निधन

Archana Banage
error: Content is protected !!