Tarun Bharat

दिल्लीत आजपासून 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी ‘जहां वोट, वहां वैक्सिनेशन’ अभियान

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्यातच आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी दिल्लीत आजपासून एक स्पेशल अभियान सुरू केले जात आहे. ‘जहां व्होट, वहां वैक्सिनेशन’ असे या अभियानाचे नाव आहे. 


याबाबत माहिती देताना केजरीवाल म्हणाले की,  ‘जहां व्होट, वहां वैक्सिनेशन’ अर्थात ज्या मतदान केंद्रावर मतदान केले, तिथेच नागरिकांना लस दिली जाणार आहे. आम्हाला जर लसीचा पूर्ण साठा उपलब्ध झाला तर दिल्लीत पुढील 4 आठवड्यात  45 पेक्षा अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना लसीकरण केले जाईल. 


पुढे ते म्हणाले, लसीकरण केंद्रावर अधिक नागरिक येत नाही आहेत. दिल्लीत लसीकरण केंद्रावर शिस्तबध्द आणि पद्धतशीरपणे तयारी सुरू आहे. बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांची एक टीम येत्या दोन दिवसात प्रत्येक घराचा दौरा करणार आहे आणि लसीकरणासाठी एक स्लॉट देणार आहे. तसेच जे लोक लस टोचून घेण्यास तयार नाही आहेत अशा नागरिकांना देखील लसीकरणासाठी तयार करणार आहे. 


पुढे केजरीवाल म्हणाले की, या अभियानाअंतर्गत, आम्ही लोकांच्या घरी जाणार आणि त्यांना सांगणार की, तुम्ही जेथे जाऊन मतदान केले त्या ठिकाणी जाऊन आपण आपले लसीकरण करून घ्यावे. त्याच केंद्रावर आम्ही तुमच्या लसीकरणाची सुविधा केली आहे. दिल्लीतील 70 वॉर्डात हे अभियान सुरू केले जाणार आहे. आणि 4 आठवडयातच सर्व 280 वॉर्डात हे अभियान पूर्ण केले जाणार आहे. 

Related Stories

जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा 3 ऑक्टोबरला

Patil_p

ईयूमधील सात देश आणि स्वित्झर्लंडमध्ये कोविशिल्ड लसीला मंजूरी

Archana Banage

अमोल कोल्हेंनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊतांची घेतली भेट, ट्वीट करत म्हणाले…

Archana Banage

केंद्राकडून राज्यांना 43.79 लसींचा पुरवठा

Amit Kulkarni

मे महिन्यात निर्यातीत लक्षणीय वाढ

Patil_p

TMC च्या पाच नेत्यांचा भाजपात प्रवेश

datta jadhav
error: Content is protected !!