Advertisements
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 1544 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 64 हजार 071 वर पोहचली आहे. यामधील 11 हजार 998 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे मंगळवारी 1155 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 47 हजार 743 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर आतापर्यंत 4330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.