Tarun Bharat

दिल्लीत कोरोना टेस्ट तिप्पट करणार : अमित शाह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीची चिंता वाढली आहे. मात्र, दिल्लीला कोरोना संकटातून वाचवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. दोन दिवसात दिल्लीतील कोरोना चाचण्या दुप्पट वाढवण्यात येतील, तर 6 दिवसांनी तिप्पट चाचण्या केल्या जातील, अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरून दिली आहे. 

दिल्लीत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज शाह यांची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे देखील उपस्थित होते. 

बैठकीनंतर शाह यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी हॉटस्पॉट भागात घरोघरी सर्व्हेक्षण केले जाईल. प्रत्येक आठवड्यात त्याचा निर्णय येईल. रुग्णांसाठी बेडची कमतरता भासत असल्याने केंद्र सरकारने तातडीने दिल्लीला 500 रेल्वेचे डबे देण्याचा निर्णय घेतला आहे. या कोचमध्ये 8000 बेड असून सर्व सोयी सुविधा असणार आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात 60 टक्के कोरोना बेड कमी दरात तसेच कोरोनाच्या चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी डॉ. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिटीची स्थापना करण्यात आल्याचेही शाह यांनी सांगितले. 

Related Stories

नितीशकुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न असफल

Patil_p

फ्रान्स संरक्षणमंत्री भारत दौऱयावर येणार

Patil_p

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना !

Patil_p

नितीशकुमारांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग

Patil_p

व्हॉट्सअॅपने आणले नवे फिचर्स…जाणुन घ्या कोणकोणते झाले बदल!

Abhijeet Khandekar

चीनहून आयात केलेल्या रॅपिड टेस्टिंग किटमध्ये तब्बल 145 टक्के नफेखोरी

prashant_c