Tarun Bharat

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.25 लाखांचा टप्पा

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत काल 574 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 25 हजार 369 वर पोहचली आहे. यामधील 5,838 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 940 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 08 हजार 434 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,536 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 86 लाख 59 हजार 830 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 43,780 आरटीपीसीआर टेस्ट आणि 37,970 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

सोनिया अन् राहुल गांधी यांना नोटीस

Patil_p

दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर

Abhijeet Shinde

तेलविहिरीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यु

Patil_p

कुलगाममध्ये 8 तास चकमक; मध्यरात्री 2 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

केजरीवाल सरकारकडून पुढील एक आठवड्यासाठी दिल्लीच्या सीमा बंद

Rohan_P

देशात 49 लाख लोकांना लसीकरण

datta jadhav
error: Content is protected !!