Tarun Bharat

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.44 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत मागील 24 तासात दिल्लीत 368 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 44 हजार 068 वर पोहचली आहे. यामधील 2, 321 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 306 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 30 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,944 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 33 लाख 58 हजार 365 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 44,526 आरटीपीसीआर टेस्ट आणि 17, 746 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 


सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 4.82 % आहे. तर 548 झोन आणि 120 कंट्रोल रूम आहेत.

Related Stories

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 पर्यंत बंद

Patil_p

शरद पवार यांना डिस्चार्ज

Patil_p

सरलष्कर जनरल बिपिन रावत अनंतात विलीन

Abhijeet Khandekar

हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ

Abhijeet Khandekar

आदिवासी महिला प्रथमच राष्ट्रपतिपदी

Amit Kulkarni

कर्ज-बेरोजगारीने घेतला हजारोंचा जीव

Amit Kulkarni