Tarun Bharat

दिल्लीत गेल्या 24 तासात 1300 नवे कोरोना रुग्ण; आत्तापर्यंत 4111 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीत गेल्या 24 तासात 1300 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 45 हजार 427 वर पोहचली आहे. यामधील 10 हजार 729 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दिलासादायक बाब म्हणजे रविवारी 1225 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख  30 हजार 587 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   


ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 11 लाख 92 हजार 082 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 5702 आरटीपीसीआर टेस्ट आणि 18,085 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

एकत्र राहिलो, तर जनतेची प्रतिसाद

Patil_p

दिल्लीत मागील 24 तासात 66 नवे कोरोना रुग्ण; 79 डिस्चार्ज!

Tousif Mujawar

स्वदेशी कार्बाइन सैन्यात सामील होणार

Patil_p

सरकारने न्याय व्यवस्थेची स्थिती सुधारावी : प्रियांका गांधी

Tousif Mujawar

जिह्यात 98 मंडलात स्वयंचलित हवामान केंद्रे बसणार

Patil_p

पाऊस नाही, तेथे निवडणुका घेण्यास अडचण काय ?

Patil_p